उपवासाला साबुदाणे का खातात? कारण आहे Interesting, कळलं तर नेहमी खाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी. अनेकजण तर या खिचडीसाठीच उपवासाच्या दिवसांची वाट पाहतात, कारण तिची चवच तेवढी भारी असते.
आशिष त्यागी, प्रतिनिधी
बागपत : उपवास म्हटलं की, तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? बऱ्याचजणांच्या डोळ्यांपुढे खमंग अशी साबुदाण्याची खिचडी आली असेल. खरंतर अनेकजण या खिचडीसाठी उपवासाच्या दिवसांची वाट पाहतात, कारण तिची चवच तेवढी भारी असते. शिवाय साबुदाणे आरोग्यासाठीही अत्यंत पौष्टिक असतात हे तुम्हाला माहितीये का?
साबुदाणा हा प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमने परिपूर्ण असा पदार्थ आहे. त्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतं. खरंतर म्हणूनच उपवासात साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात. कारण त्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं. परंतु साबुदाण्यामुळे वजन वाढतं हेसुद्धा खरंच आहे.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर राघवेंद्र चौधरी सांगतात की, 'साबुदाणा म्हणजे आरोग्यासाठी वरदान. त्यात शरिराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर मजबूत होतं आणि वजन वाढतं. साबुदाणा नियमितपणे खाल्ल्यास संधिवात नियंत्रणात येतो. एकूणच, बाजारात सहज मिळणाऱ्या साबुदाण्यापासून शरिराला अनेक फायदे मिळतात.'
advertisement
'असे' खा साबुदाणे!
डॉ. राघवेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साबुदाण्याची खिचडी आणि वडे बनवून सर्वचजण खातात. याव्यतिरिक्त आपण दुधातही साबुदाणे खाऊ शकता. म्हणजे कच्चे साबुदाणे खायचे असं नाही, तर साबुदाण्याची खीर बनवून खायची. त्यामुळे शरीर छान ऊर्जावान राहील आणि वजन वेगाने वाढेल. याचाच अर्थ असा की, वजन कमी करायचं असेल तर साबुदाणे प्रमाणात खा.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Baghpat,Uttar Pradesh
First Published :
March 06, 2024 7:30 PM IST