How to gain weight : सडपातळ शरिरामुळे त्रस्त आहात? वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Last Updated:

पोटाची चरबी कमी करणं हा मोठा टास्क असतो. तर याउलट काही स्लिम लोकांचं दु:ख वेगळंच असतं. त्यांचं वजन काही केल्या वाढतच नाही.

याबाबत काळजी करण्यासारखं काही नाहीये.
याबाबत काळजी करण्यासारखं काही नाहीये.
रिया पांडे, प्रतिनिधी
नवी दिल्ली : आजकाल कितीही धावपळीचं आयुष्य असलं तरी कोणालाच आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करायचं नसतं. त्यात जवळपास प्रत्येकासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, पोट आत कसं जाईल? बारीक होण्यासाठी अनेकजण प्रयत्नात असतात. त्यातही पोटाची चरबी कमी करणं हा मोठा टास्कच असतो. तर याउलट काही स्लिम लोकांचं दु:ख वेगळंच असतं. त्यांचं वजन काही केल्या वाढतच नाही. मग वजन वाढवण्यासाठी ते एक ना अनेक उपाय करतात पण फरक काही पडत नाही. खरंतर याबाबत काळजी करण्यासारखं काही नाहीये. वजन कमी करणं असो किंवा वाढवणं असो, डायट महत्त्वाचं आहे. नेमके कोणते पदार्थ खावे हे माहित असायला हवं आणि मनावर नियंत्रण हवं.
advertisement
कृतिका कपूर यांना राजधानी दिल्लीतील बेस्ट जिम अवॉर्ड मिळालाय. त्या सांगतात, वजन वाढवण्यासाठी शरिरात जास्तीत जास्त प्रोटीन जायला हवं. त्यासाठी आपण अंडी, मासे, पनीर, दही खाऊ शकता. वजन वाढताना शरिराला कोणताही आजार जडू नये यासाठी बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं. जास्तीत जास्त घरचंच जेवण पोटात जाईल याची काळजी घ्यावी. शिवाय सुदृढ शरिरासाठी व्यायाम हवाच. तसंच कृतिका यांनी आणखी काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. त्या जाणून घेऊया.
advertisement
वजन वाढवण्यासाठी...
  • डायटमध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा.
  • हाय फॅट्स स्नॅक्स खा.
  • दूध आणि जास्त कॅलरीज असलेल्या ड्रिंक्स प्या.
  • भरपूर फळं आणि भाज्या खा.
  • वेगवेगळ्या धान्यांच्या चपाती खा.
  • भूक लागेल तेव्हा तेव्हा पोटभर जेवा.
  • advertisement
  • आपण गोड पदार्थ खाऊ शकता, परंतु प्रमाणात.
  • व्यायम करा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
    लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
    मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
    How to gain weight : सडपातळ शरिरामुळे त्रस्त आहात? वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
    Next Article
    advertisement
    Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
      View All
      advertisement