11 मोदकपासून सुरुवात, आज दिवसाला 5 ते 6 हजार मोदकची विक्री, महिलेच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी!, VIDEO

Last Updated:

ममता बाविस्कर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आज तब्बल 16 महिलांना रोजगारही पुरवत आहेत. एका मोदकपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज तब्बल 5 हजार ते 6 हजार मोदकांवर पोहोचला आहे. नेमका हा प्रवास कसा सुरू झाला, याचबाबत आपण जाणून घेऊयात.

+
ममता

ममता फूड नाशिक

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : सर्वत्र आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणरायाला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. याच मोदकविक्रीच्या व्यवसायातून एका महिलेने एक यशस्वी उद्योजिका होऊन दाखवले आहे. आज नाशिकमधील ममता फूड येथील मोदक सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. पण नेमका हा प्रवास कसा सुरू झाला, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
ममता राजेंद्र बाविस्कर असे या महिलेचे नाव आहे. ममता या मागील 23 वर्षांपासून म्हणजे 2001 पासून या व्यवसायात आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये सर्वात आधी त्यांना 11 मोदकची ऑर्डर मिळाली आणि त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्या दिवसाला 5 हजारहून अधिक मोदक नाशिकसह नाशिकच्या बाहेर पुरवत आहेत.
advertisement
ममता यांना खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असल्यानेच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी नाशिक येथील एका हॉटेलमध्ये 11 उकडीचे मोदक पुरविले होते. त्याची चव त्यांना आवडल्यानंतर आणखी ऑर्डर मिळाल्याने त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला 4 रुपये किंमतीने एका मोदकची विक्री करायच्या. आज या एका मोदकची किंमत 25 रुपये आहे.
advertisement
50 टक्के अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आणि बरंच काही, शेतकऱ्यांनो नेमकं काय करालं?, VIDEO
ममता बाविस्कर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आज तब्बल 16 महिलांना रोजगारही पुरवत आहेत. एका मोदकपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज तब्बल 5 हजार ते 6 हजार मोदकांवर पोहोचला आहे. सुरुवात करणे महत्वाचे आहे आणि याच हेतूने मी पुढे जात राहिली. आता माझे मोदक नाशिकबाहेरही पोहचेले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
Amravati News : आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा! जिल्ह्यातील 2198 आशा सेविकांना मिळणार सुरक्षा कवच
ममता फूड यांच्याकडे तळलेले मोदक तसेच उकडीचे मोदक मिळतात. येथील उकडीच्या मोदकाला जास्त लोकांची पसंती मिळाली आहे. तुम्हाला लागतील तितके मोदक ते बनवून देतात. तर मग तुम्हालाही येथील मोदकची चव घ्यायची असेल तर तुम्ही नाशिक येथील कॉलेज रोडवर लाजीज पिझ्झाच्या बाजूला असलेल्या ममता फूड या आउटलेटला नक्की भेट देऊ शकतात. ममता यांचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/Food/
11 मोदकपासून सुरुवात, आज दिवसाला 5 ते 6 हजार मोदकची विक्री, महिलेच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी!, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement