Famous Panipuri: हटके पाणीपुरी, एकाचं प्लेटमध्ये 5 चवींचा अनुभव, पिंपरी-चिंचवडमधील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पाणीपुरीचं नाव जरी निघालं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
पुणे : पाणीपुरीचं नाव जरी निघालं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी स्टेशन परिसरात पाणीपुरी प्रेमींसाठी 'वाह पाणीपुरी' या स्टॉलवर एका प्लेटमध्ये तब्बल पाच वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेता येणार आहे. प्रत्येक पाणीपुरीमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचा अनुभव घेता येणार आहे.
कमी किमतीत हटके ऑफर
फक्त 30 रुपयांत एक प्लेट आणि 90 रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी अशी खास ऑफर इथे आहे. या पाच चवींमध्ये खट्टी-गोड, तिखट, पुदिना, कच्चा मँगो, मसालेदार आणि एक खास स्पेशल फ्लेवरचा समावेश आहे. प्रत्येक घास वेगळी चव आणि वेगळा अनुभव देतो. पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातून अनेकजण या आगळ्या वेगळ्या पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. विशेषता संध्याकाळच्या वेळेला या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पाणीपुरीची ही हटके स्टाईल सोशल मीडियावरदेखील जोरदार व्हायरल झाली आहे.
advertisement
नोकरीतून व्यवसायाकडे प्रवास
'वाह पाणीपुरी' हा स्टॉल विशाखा पाटील यांचा आहे. याआधी त्या नोकरी करत होत्या, पण स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होत. नाशिकला फिरायला गेल्यावर त्यांनी पाच चवींची पाणीपुरी चाखली आणि ती खूप आवडली. त्याच अनुभवातून त्यांना नवा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
advertisement
विशाखा सांगतात, नाशिकला गेल्यावर पाच चवींची पाणीपुरी खाल्ली. खूप आवडली. त्याच वेळी आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. म्हणूनच 'वाह पाणीपुरी'ची सुरुवात केली. सध्या या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळत असून पाणीपुरी प्रेमींमध्ये त्यांचा स्टॉल लोकप्रिय झाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 22, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/Food/
Famous Panipuri: हटके पाणीपुरी, एकाचं प्लेटमध्ये 5 चवींचा अनुभव, पिंपरी-चिंचवडमधील हे ठिकाण माहितीये का?

