पित्त होईल गायब, 20 वर्षांपासून मिळतोय सोलापुरात, तुम्ही कधी पिलाय का झोंगा? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर शहरातील मरीआई चौकात पटेल ब्रदर्स या कोल्ड्रिंक दुकानामध्ये गेल्या 20 वर्षांपासून झोंगा नावाचा पेय बनवला जातो. पित्त, अॅसिडिटी होऊ नये म्हणून हा झोंगा पिला जातो.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहरातील मरीआई चौकात पटेल ब्रदर्स या कोल्ड्रिंक दुकानामध्ये गेल्या 20 वर्षांपासून झोंगा नावाचा पेय बनवला जातो. पित्त, अॅसिडिटी होऊ नये म्हणून हा झोंगा पिला जातो. हा झोंगा कसा बनवला जातो आणि त्याचा काय फायदा आहे? या संदर्भात अधिक माहिती झोंगा विक्रेते मुकद्दर पटेल यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
सोलापुरातील मरीआई चौकात गेल्या 60 वर्षांपासून कोल्ड्रिंक दुकान असून या ठिकाणी 20 वर्षांपासून झोंगा बनविला जात आहे. काही वर्षांपूर्वी पटेल यांच्या दुकानावर एक ग्राहक आले होते. त्यांनी पित्तासाठी चांगला सोडा बनवून द्या असे सांगितले होते. तेव्हा त्यांनी अद्रक पेस्ट, लिंबू आणि स्वतः तयार केलेला मसाला टाकून हा झोंगा तयार करून दिला.
advertisement
तेव्हापासून पटेल यांच्या कोल्ड्रिंक दुकानात झोंगा पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते. एका झोंगा ग्लासची किंमत 20 रुपये इतकी असून त्यामध्ये अद्रक पेस्ट, लिंबू, पटेल ब्रदर्स यांनी स्वतः घरात तयार केलेला मसाला टाकून 100 मी.ली पर्यंत हा झोंगा ग्राहकाला पिण्यासाठी देतात. हा झोंगा पिल्याने पित्त, मळमळ होणे याचा त्रास होत नाही. झोंग्याची ही तिखट, आंबट असते.
advertisement
मरीआई चौकात असलेल्या पटेल ब्रदर्स यांच्या कोल्ड्रिंक दुकानात झोंग्यासह लिंबू सरबत, जीरा सोडा, मसाला सोडा, लेमन सोडा, ऑरेंज सोडा आणि उसाचा देखील पिण्यासाठी या ठिकाणी मिळत आहे. दररोज 30 ते 40 ग्लास झोंग्याची विक्री याठिकाणी होत आहे. तसेच इतर सोडा विक्रीतून सर्व खर्च वजा करून दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती झोंगा विक्रेते मुकद्दर पटेल यांनी दिली आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 02, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पित्त होईल गायब, 20 वर्षांपासून मिळतोय सोलापुरात, तुम्ही कधी पिलाय का झोंगा? Video