अवघ्या 20 रुपयांना मिळणारी ही जुडी हृदयरोगापासून हाडांसाठी A वन; फायदे वाचाल तर चकीत व्हाल!

Last Updated:

आयुर्वेदात अनेक गंभीर आजारांपासून मुक्त होण्यासाठी या भाजीचा वापर केला जातो. हा शेतातच नाही तर इतर ठिकाणीही उगवतो.

News18
News18
मुंबई, 25 सप्टेंबर : आपण ज्या पालेभाज्या खातो, त्याचे खूप फायदे असतात. अशीच एक आणखी पालेभाजी आहे, जी खाल्ल्याने आपले शरीर निरोगी राहते. आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. या भाजीचं नाव म्हणजे राजगिरा होय. राजगिऱ्याचा वापर आयुर्वेदात अनेक गंभीर आजारांपासून मुक्त होण्यासाठी केला जातो. हा शेतातच नाही तर इतर ठिकाणीही उगवतो.
राजगिरा शरीरात निर्माण होणारे विषारी घटक कमी करतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. भारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये राजगिराच्‍या गुणांबद्दल उल्लेख आहेत. राजगिरा साप आणि किड्यांचे विष काढून टाकण्‍यासाठी प्रभावी आहे. त्याचा इतिहास हजारो वर्षे जुना मानला जातो. याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
खूप फायदेशीर आहे राजगिरा
राजगिऱ्याची भाजी अगदी सहज उपलब्ध आहे. ही हिरवी पालेभाजी आहे, ज्याचे देठ आणि पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. राजगिऱ्याला अमरंथ असंही म्हणतात. राजगिरा एक अशी वनस्पती आहे ज्याची मुळे, पाने, बिया, फुले इत्यादींचा उपयोग आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
advertisement
कोणत्या आजारात फायदेशीर आहे राजगिरा
संधिवात, ब्लड प्रेशर आणि हृदयविकारात
संधिवात, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांवर राजगिरा रस खूप फायदेशीर आहे. राजगिऱ्याची भाजी अनेकांना खायला आवडते. पोटाचे आजार, बद्धकोष्ठता आणि केस गळणे यावर राजगिऱ्याची भाजी खाणे फायदेशीर ठरते.
advertisement
मजबूत हाडांसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे आणि राजगिऱ्याची भाजी त्याची कमतरता पूर्ण करते. जर शरीरात भरपूर कॅल्शियम असेल तर हाड तुटण्याचा किंवा फ्रॅक्चरचा धोका कमी होतो आणि नखं, दात निरोगी आणि मजबूत राहतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी
राजगिऱ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर तुमची दृष्टी कमकुवत झाली असेल किंवा तुम्हाला डोळ्यांशी संबंधित इतर कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर दररोज याचे सेवन सुरू करा.
advertisement
शरीराला बनवते अॅक्टिव्ह
राजगिऱ्यामध्ये लायसिन मुबलक प्रमाणात असते आणि ते शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते. यामुळे थकवा दूर होतो आणि त्याचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.
इम्यूनिटी बूस्ट करतो
राजगिऱ्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे सर्व फायदे लक्षात घेऊन तुम्ही याचे रोज सेवन करावं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अवघ्या 20 रुपयांना मिळणारी ही जुडी हृदयरोगापासून हाडांसाठी A वन; फायदे वाचाल तर चकीत व्हाल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement