Garlic Powder benefits: लसूण सोलल्यानंतर सालं फेकून देता? ही चूक करू नका, सालांपासून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर

Last Updated:

Tips to make garlic powder at home: लसूण सोलल्यानंतर जर त्याची सालं तुम्ही फेकून देत असाल तर ती आत्ताच थांबावा. कारण लसणाच्या सालींपासून घरच्या घरीच आरोग्यदायी पावडर कशी बनवायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

प्रतिकात्मक फोटो : लसूण सोलल्यानंतर सालं फेकून न घरीच बनवा लसणाची पावडर
प्रतिकात्मक फोटो : लसूण सोलल्यानंतर सालं फेकून न घरीच बनवा लसणाची पावडर
मुंबई : स्वयंपाक घरातले मसाले जसे बहुगुणी आरोग्यदायी आहेत तसंच आपण वापरत असलेली फळं, भाज्यांच्या साली या सुद्धा फायद्याच्या ठरू शकतात. तुम्ही शाकाहारी असा किंवा मासांहारी तुमच्या जेवणात लसणाचा वापर होतोच होतो. मग ते मच्छी तळण्यासाठी लावलेलं आलं-लसनाचं वाटण असो किंवा आंबट वरणात टाकलेल्या लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे त्याचा जेवणात वापर होतोच होतो. मात्र लसूण सोलल्यानंतर जर त्याची सालं तुम्ही फेकून देत असाल तर ती आत्ताच थांबावा. कारण लसणाच्या सालींपासून घरच्या घरीच आरोग्यदायी पावडर कशी बनवायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

लसणाच्या सालीचे फायदे

लसणाची साल ही  मसाल्यांची चव वाढवणारा एक उत्तम घटक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जर लसणाच्या साली सुकवून त्यांची पावडर करून वापरतील तर जे अन्नपदार्थ तुम्ही बनवत आहात त्याची चव वाढू शकते. या पावडरचा वापर तुम्ही भाज्या, सूप, करी, नूडल्स, पिझ्झा, सॅलड किंवा अन्य कोणत्याही डिशची चव वाढवण्यासाठी करू शकता.
advertisement

घरी लसूण पावडर कशी बनवायची ?

  1. सर्वप्रथम लसणाची सालं नीट धुवून घ्या. जेणेकरून त्यावर काही घाण किंवा किडे, कीटकनाशकं असतील तर ती निघून जातील. नंतर ही सालं उन्हात नीट वाळवून घ्या.
  2. तुमच्या घरी ऊन येत नसेल किंवा उन्हात वाळवणं शक्य नसेल तर ओव्हनमध्येही थोडं गरम करून घ्या. सुकल्यानंतर ही सालं मिक्सरमध्ये टाकून त्यांची बारीक पावडर करून घ्या.
  3. तुमचा लसून मसाला तयार झाला. तयार झालेली ही लसणाची पावडर हवाबंद डब्यात ठेवा आणि गरज असेल तेव्हा अन्य मसाले किंवा मिठासह या पावडरचा वापर करा.
advertisement
तुमच्या घरात कोणाला लसून खाणं आवडत नसेल तर चपाती किंवा भाकरी बनवताना, पीठ मळताताना एक चमचा लसणाची पावडर टाकल्यास त्या चपाती किंवा भाकरीची चव आणि आरोग्यदायी फायदे वाढतील.सलाड किंवा सूप बनवताना, किंवा पुलाव राईसमध्ये तुम्ही या पावडरचा वापर करू शकता.
advertisement
त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही लसूण वापरताना त्याची सालं फेकून न देता एका डब्यात जपून ठेवा आणि मग त्यांचा पावडर म्हणून वापर करा. जेणेकरून पदार्थांची चव तर वाढेलच मात्र ही लसणाची पावडर तुम्हाला निरोगी ठेवायलाही मदत करेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Garlic Powder benefits: लसूण सोलल्यानंतर सालं फेकून देता? ही चूक करू नका, सालांपासून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement