advertisement

Gauri Pujan Wishes : सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला, अशा द्या गौरीपूजनाच्या शुभेच्छा

Last Updated:

Gauri Pujan Wishes In Marathi : गौरी आवाहन आणि गौरीपूजन हा महिलांसाठी खास सण. त्यामुळे एकमेकींना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देणंही आलंच. अगदी पतीही आपल्या पत्नीला या शुभेच्छा देऊ शकतात.

News18
News18
गणपती बाप्पाची सगळे जितक्या आतुरतेने वाट पाहतात तितक्याच आतुरतेने गौरीचीदेखील वाट पाहिली जाते. विशेषत: महिलांना गौराईची प्रतीक्षा असते. गौराई म्हणजे गणेशाची आई पार्वती. जी आपल्या बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी भक्तांच्या घरी येते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घरी परतते. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तिच पूजाआरती केली जाते.
ही माहेरवाशिणी असल्याने तिचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केलं जातं. तिच्या आवडीचे पदार्थ करू तिला नैवेद्य दाखवला जातो. तसेच गौराईच्या पुजेनिमित्त रात्र जागवली जाते. महिलांसाठी हा खास सण. त्यामुळे एकमेकींना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देणंही आलंच. अगदी पतीही आपल्या पत्नीला या शुभेच्छा देऊ शकतात.
advertisement
सोन्यामोत्यांच्या पावली
आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,
पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
advertisement
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद
advertisement
आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा!
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो.
-----------------------------------------------------------
आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया
advertisement
तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजेच्या शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो
हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
advertisement
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा भाद्रपद
सौभाग्यवती पुजती गौरीगणपती
खेळ खेळुनी पारंपरिक थोर!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
गौराईच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gauri Pujan Wishes : सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला, अशा द्या गौरीपूजनाच्या शुभेच्छा
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement