advertisement

Green Peas Pickle : कैरीचं-लिंबाचं लोणचं सोडा, खा हिरव्या मटारचं लोणचं! चवीला जबरदस्त, बनवणंही अगदी सोपं

Last Updated:

Green Peas Pickle Recipe In Marathi : तुम्ही मटारचं लोणचं खाल्लं नसेल तर ही सोपी रेसिपी तुमच्यासाठीच आहे. शेफ भूपी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही रेसिपी शेअर केली आहे.

मटारचं लोणचं बनवण्याची पद्धत
मटारचं लोणचं बनवण्याची पद्धत
मुंबई : लोणचं भारतीय जेवणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रोजच्या जेवणात आपल्याला वरण-भात भाजी पोळीसह लोणचंदेखील हवं असतं. आपल्याकडे प्रत्येक उन्हाळयात कैरीचं लोणचं घरी बनवलं जातं. त्यासोबतच लोक आता वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवतात. गाजराचं लोणचं, मुळ्याचं लोणचं, आवळ्याचं लोणचं.. पण तुम्ही कधी ताज्या हिरव्या मटारचं लोणचं खाल्लं आहे का?
तुम्ही मटारचं लोणचं खाल्लं नसेल तर ही सोपी रेसिपी तुमच्यासाठीच आहे. शेफ भूपी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही रेसिपी शेअर केली आहे. हे हिरव्या मटारचं लोणचं बनवणं अगदी सोपं आहे. चला पाहूया ते कस बनवायचं..
मटारचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य
हे लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप हिरवे मटार, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून काळी मिरी, 1/2 टीस्पून मेथीचे दाणे, 1 टीस्पून मोहरी, 15-20 हिरव्या मिरच्या, 1 कप मोहरीचे तेल, 1 टीस्पून कालौन्जी, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून हिंग, 10-12 कढीपत्ता, 2 टीस्पून हळद पावडर, 4 टीस्पून काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि 2-3 टीस्पून व्हिनेगर लागेल.
advertisement
मटारचं लोणचं बनवण्याची पद्धत
- घराच्या घरी मटारचं लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी मटार सोलून घ्या. एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात थोडे मीठ, साखर घाला आणि त्यामध्ये मटार टाका. मटारला उकळी येऊ देऊ नका. त्यापूर्वीच काढू घ्या.
- यानंतर मटार काढून थंड पाण्यात 5 मिनिटे ठेवा आणि नंतर गाळून घ्या. दुसऱ्या बाजूला जीरे, मोहरी, बडीशेप आणि काळी मिरी एका पॅनमध्ये भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
advertisement
- त्यानंतर एका पॅनमध्ये मोहरीचे तेल घाला. त्यात लवंग, ओवा, हिंग आणि कढीपत्ता घाला. नंतर मसाले, हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळे मीठ आणि साधे मीठ घालून चांगले हलवा.
- यानंतर यामध्ये व्हिनेगर आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले मिक्स करा. शेवटी मटार घाला आणि व्यवस्थित सर्व मसाला मटारला लावून घ्या. म्हणजेच व्यवस्थित एकत्र करा.
advertisement
- आता अनेक शेवटची पायरी आहे, ज्यामुळे तुमच्या लोणच्याला अगदी छान सुगंध येईल. यासाठी एक जळता कोळसा घ्या, त्यावर 3-4 लवंगा ठेवा आणि त्यावर तूप घाला. येत ज्या डब्यात तुम्हाला लोणचं भरायचा आहे, तो काचेचा दाबघ्या आणि तो या कोळश्यावर पालकथा ठेवा. यामुळे तो सर्व धूर डब्यामध्ये जाईल.
- एकदा धूर व्यवस्थित डब्यामध्ये भरला की त्यात बनवलेलं लोणचं टाका आणि डब्याचं झाकण व्यवस्थित लावून ठेवा.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Chef Bhupi (@chefbhupikitchen)



advertisement
हे लोणचं बनवायला सोपं आहे आणि खूप टेस्टीसुद्धा.. तुम्ही हे लोणचं लगेच खायला घेऊ शकता किंवा ते 5 दिवस मुरू द्या. त्यानंतर त्याची चव अगदी अप्रतिम लागेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Green Peas Pickle : कैरीचं-लिंबाचं लोणचं सोडा, खा हिरव्या मटारचं लोणचं! चवीला जबरदस्त, बनवणंही अगदी सोपं
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement