हे पांढऱ्या फुलाचं झाड सहज बहरतं; 12 महिने फुलतं! देवपूजेसाठीच नव्हे तर आरोग्यालाही उपयुक्त
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
या फुलाला चांदणी, चटक चांदणी आणि तगर अशा विविध नावांनी मराठी प्रांतात ओळखलं जातं. कुंडीत कसं लावायचं रोप यापासून ते देवपूजेव्यतिरिक्त फुलाचे काय काय फायदे आहेत या सगळ्याविषयी...
काजल मनोहर
जयपूर : पांढऱ्या फुलांच्या जगात चांदणीचं फूल खूप महत्त्वाचं मानलं जातं. या फुलाला चांदणी, चटक चांदणी आणि तगर अशा विविध नावांनी मराठी प्रांतात ओळखलं जातं. या फुलांना साधारण 6-7 पाकळ्या असतात आणि विशेष म्हणजे ही फुलं वर्षभर बहरतात. चांदणीची फुलं सजावटीसाठी, गजरा आणि देवी-देवतांच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
advertisement
चांदणीचं रोप कसं लावावं?
बागकाम तज्ञ रमेश कुमार यांच्या मते, चांदणीचं रोप मातीत किंवा कुंडीत लावता येतं. रोप लावण्यासाठी कोकोपीट आणि खत एकत्र करून कुंडीत घाला. नंतर पॉलिथिनमधून रोप बाहेर काढून मातीमध्ये दाबून ठेवा थोडा वेळ सावलीत असेल आणि थोडा वेळ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी कुंडी ठेवा. काही दिवसात रोपाची वाढ सुरू होईल आणि फुलं येतील.
advertisement
चांदणीची फुलं केवळ देवपूजेसाठीच नव्हे तर आयुर्वेदानुसार आरोग्यासाठीही उपयुक्त असतात.
चांदणीचे आयुर्वेदिक फायदे:
- डोकेदुखीपासून आराम: चांदणीच्या झाडातून मिळणारे दूध तेलात मिसळून डोक्यावर लावल्याने डोकेदुखी आणि डोळ्यांच्या दुखण्यात आराम मिळतो.
advertisement
धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व:
धार्मिक तज्ञ चंद्रप्रकाश धनधन यांच्या मते, चांदणीच्या फुलांना धार्मिक विधीमध्ये विशेष महत्त्व आहे. यांचा वापर देवी-देवतांच्या पूजेसाठी केला जातो आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. घरात चांदणीची फुले ठेवल्याने सुख, शांती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार या फुलांचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी होतो.
advertisement
Location :
Jaipur,Rajasthan
First Published :
Sep 27, 2024 8:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हे पांढऱ्या फुलाचं झाड सहज बहरतं; 12 महिने फुलतं! देवपूजेसाठीच नव्हे तर आरोग्यालाही उपयुक्त









