advertisement

IPL 2026 : पहिल्याच बॉलला शमीचा घातक वार, आगरकरचा सगळा राग राहुलवर काढला, Video

Last Updated:

आयपीएल 2026 च्या पाचव्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्स त्यांच्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्याच बॉलला अजित आगरकरला प्रत्युत्तर दिलं आहे.

पहिल्याच बॉलला शमीचा घातक वार, आगरकरचा सगळा राग राहुलवर काढला
पहिल्याच बॉलला शमीचा घातक वार, आगरकरचा सगळा राग राहुलवर काढला
लखनऊ : आयपीएल 2026 च्या पाचव्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्स त्यांच्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करत आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या लखनऊ सुपर जाएंट्सचा 18.4 ओव्हरमध्ये 141 रनवर ऑलआऊट झाला. दिल्लीच्या तगड्या बॅटिंग लाईनअप समोर हा स्कोअर छोटा वाटत होता, पण मोहम्मद शमीने पहिल्याच बॉलला असं काही केलं, ज्याचा अंदाज कुणालाच नव्हता.

पहिल्याच बॉलवर राहुल आऊट

लखनऊने दिलेल्या 142 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीला पहिल्याच बॉलला धक्का लागला. लखनऊकडून आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीने दिल्लीचा ओपनर केएल राहुलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मोहम्मद शमीने टाकलेल्या आऊट स्विंगवर केएल राहुलने कव्हच्या वरून हवेत शॉट मारला, पण राहुलच्या बॅटजी एज लागली आणि बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मोहसिन खानने कॅच पकडला. पहिल्याच बॉलला विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने जोरदार सेलिब्रेशन केलं. लखनऊसोबत मोहम्मद शमीचा हा पहिलाच सिझन आहे, याआधी मागच्या मोसमात शमी सनरायजर्स हैदराबादसोबत होता, पण निराशाजनक कामगिरीनंतर हैदराबादने त्याला लखनऊकडे ट्रेड केलं.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)



advertisement

शमी-आगरकरचा वाद

2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर मोहम्मद शमीची टीम इंडियात निवड झाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतरही टीम इंडियात निवड होत नसल्यामुळे मोहम्मद शमीने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावरही निशाणा साधला होता, ज्यावर अजित आगरकर यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. शमी आणि आगरकर यांच्यात उडालेल्या खटक्यांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
advertisement
रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भेदक बॉलिंग केल्यानंतर आता मोहम्मद शमीने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉलला विकेट घेऊन पुन्हा एकदा भारतीय निवड समितीला त्याच्या कामगिरीतूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

शमीचा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा पहिल्या बॉलला विकेट घेण्याचा विक्रमी मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शमीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 वेळा पहिल्या बॉलला विकेट मिळवली आहे. प्रविण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक डिंडा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 3 वेळा आयपीएलमध्ये पहिल्या बॉलला विकेट घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पहिल्याच बॉलला शमीचा घातक वार, आगरकरचा सगळा राग राहुलवर काढला, Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement