Mustard Oil : लांबसडक केसांसाठी सोपी रेसिपी, मोहरीचं तेल करेल केस घनदाट, केसांना येईल चमक

Last Updated:

प्राचीन काळापासून आजी - पणजी केसांसाठी नारळाचं तेल, बदामाचं तेल, मोहरीचं तेल वापरत आहेत. मोहरीच्या तेलातले अनेक घटक टाळूमधे रक्ताभिसरण वाढवतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. यात काही औषधी वनस्पतीही असतील तर हे तेल आणखी परिणामकारक ठरतं. 

News18
News18
मुंबई : केस लांबसडक आणि दाट असावेत असं वाटत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. आजच्या जीवनशैलीमुळे, धूळ-प्रदूषणामुळे आणि रासायनिक उत्पादनांमुळे केसांची चमक आणि वाढ आधीच्या तुलनेत कमी होते.
काळ्याभोर केसांसाठी नैसर्गिक उपाय म्हणजे तेल. वर्षानुवर्ष हे उपाय केले जातायत. एक सोपा, नैसर्गिक आणि स्वस्त उपाय म्हणजे मोहरीचं तेल.
प्राचीन काळापासून आजी - पणजी केसांसाठी नारळाचं तेल, बदामाचं तेल, मोहरीचं तेल वापरत आहेत. मोहरीच्या तेलातले अनेक घटक टाळूमधे रक्ताभिसरण वाढवतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात. यात काही औषधी वनस्पतीही मिसळल्या तर हे तेल आणखी परिणामकारक ठरतं.
advertisement
हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला सहा साध्या घटकांची आवश्यकता आहे. शंभर मिलीलीटर मोहरीचं तेल, दहा ग्रॅम अमरबेल, दहा ग्रॅम ओवा, दहा ग्रॅम मेथीचे दाणे, दहा ग्रॅम काळी मिरी, काही थेंब लव्हेंडर सुगंधी तेल.
प्रथम, मोहरीचं तेल गरम करा, त्यात अमरबेल घाला आणि ते काळे होईपर्यंत उकळा. नंतर, ओवा, मेथी आणि काळी मिरी घाला आणि चांगले परतून घ्या. थंड झाल्यावर, तेल गाळून घ्या आणि शेवटी, काही थेंब लव्हेंडर तेल घाला.
advertisement
आठवड्यातून दोनदा हे तेल लावा. झोपण्यापूर्वी केसांना हलक्या हातानं मसाज करा आणि सकाळी सौम्य शाम्पूनं केस धुवा. काही आठवड्यांतच तुम्हाला फरक जाणवेल.. या तेलामुळे तुमचे केस लांब, मजबूत, मऊ आणि चमकदार होतील. या घरगुती मोहरीच्या तेलानं केसांना चांगली चमक येईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mustard Oil : लांबसडक केसांसाठी सोपी रेसिपी, मोहरीचं तेल करेल केस घनदाट, केसांना येईल चमक
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement