Smile Day : वर्ल्ड स्माइल डे, चेहऱ्यावर येऊ दे हसू, शरीर - मनासाठीचं औषध

Last Updated:

दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक स्मित दिन साजरा केला जातो. यावर्षी तो 3 ऑक्टोबर 2025 ला साजरा केला जाईल. याची सुरुवात 1999 मधे अमेरिकन कलाकार हार्वे बॉल यांनी केली होती, ज्यांनी प्रसिद्ध स्मायली फेस देखील डिझाइन केला होता.

News18
News18
मुंबई : ताणतणावामुळे व्यक्त होणं आणि त्यातूनही हसणं कमी झालं असेल तर ही माहिती आधी वाचा. कारण हसणं शरीर आणि मनाला खूप फायदेशीर आहे. तुमचं हसणं कमी झालं असेल उद्यापासून थोडं हसायला सुरु करा. कारण उद्या आहे वर्ल्ड स्माईल डे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक स्मित दिन साजरा केला जातो. यावर्षी तो 3 ऑक्टोबर 2025 ला साजरा केला जाईल. याची सुरुवात 1999 मधे अमेरिकन कलाकार हार्वे बॉल यांनी केली होती, ज्यांनी प्रसिद्ध स्मायली फेस देखील डिझाइन केला होता.
हास्य ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती जगभर पसरली पाहिजे असा त्यांचा उद्देश होता. या कल्पनेमुळे जागतिक स्मित दिनाची स्थापना झाली. जेणेकरून लोक किमान एक दिवस मोकळेपणानं हसू शकतील आणि इतरांनाही हसण्याची संधी देऊ शकतील.
advertisement
आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव, चिंता आणि थकवा हे प्रत्येकाचे सततचे साथीदार बनले आहेत. अशा वातावरणात, हसणं आणखी महत्वाचं आहे. हसण्यानं केवळ आपल्याला बरं वाटत नाही तर ते आपल्या शरीर आणि मनासाठी एक प्रकारचं उपचार म्हणून देखील काम करतं.
advertisement
फक्त पाच मिनिटं मोठ्यानं हसल्यानं शरीराला आणि मनाला अनेक फायदे मिळतात.
ताणतणाव कमी होतात - हसण्यामुळे मेंदूमधे एंडोर्फिन नावाचे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे ताण कमी होतो आणि मूड त्वरित सुधारतो. हे वैज्ञानिक संशोधनातून दिसून आलं आहे.
मानसिक आरोग्य सुधारतं -  न्यूरोसायन्सनुसार, तुम्ही हसता तेव्हा मेंदू डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन रिलीज करतो. हे नैसर्गिक मूड बूस्टर आहेत ज्यामुळे चिंता कमी होतात आणि सकारात्मक विचार करण्यास मदत करतात.
advertisement
स्नायू सक्रिय करणं - आपण मनापासून हसतो ज्याला डचेन स्माईल म्हणतात, तेव्हा चेहऱ्याचे अनेक स्नायू सक्रिय होतात, विशेषतः झिगोमॅटिक मेजर आणि ऑर्बिक्युलरिस ऑक्युली स्नायू. म्हणूनच खऱ्या हास्यात केवळ ओठच नाही तर डोळे देखील समाविष्ट असतात.
advertisement
दीर्घायुष्याचं रहस्य - वेन स्टेट युनिव्हर्सिटीनं 2010 मधे केलेल्या एक अभ्यास यासाठी महत्त्वाचा आहे. जे लोक जास्त हसतात ते सरासरी सात वर्षं जास्त जगतात.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं - हसण्याची सवयीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील सक्रिय राहते. यामुळे शरीर आजारांशी लढण्यास अधिक सक्षम होतं. हसणं ही केवळ प्रतिक्रिया नाही तर
advertisement
चेहऱ्यावरील हावभाव नाही; ते एक नैसर्गिक औषध आहे जे आपले मन आणि शरीर निरोगी ठेवते. म्हणूनच तज्ञ दररोज किमान काही मिनिटे मनापासून हसण्याची शिफारस करतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Smile Day : वर्ल्ड स्माइल डे, चेहऱ्यावर येऊ दे हसू, शरीर - मनासाठीचं औषध
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement