Happy Dussehra Wishes : आला आला दसरा! सोन्यासारख्या माणसांना सोन्यासारख्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Last Updated:

Happy Dussehra Wishes In Marathi : सोनं देताना आपण फक्त हॅप्पी दसरा किंवा दसऱ्याच्या शुभेच्छा असंच म्हणतो. पण आता सोन्यासोबत या सोन्यासारख्या शुभेच्छाही द्या. जेणेकरून तुमच्या सोन्यासारख्या माणसांची दसरा खऱ्या अर्थाने सोन्यासारखा होईल.

News18
News18
नवी दिल्ली : नवरात्रोत्सव संपला आता दसरा आला. दसरा किंवा विजयादशमी हा सण विजय, सद्गुण, सत्याचं, शुभारंभाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी जीवनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा संकल्प केला जातो. अशा या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देणं आलंच. तुम्हीही दसऱ्याच्या अशा शुभेच्छा शोधत असाल, आम्ही तुमच्यासाठी आपल्या मित्र-परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास दसऱ्याच्या शुभेच्छा मेसेज आणले आहेत.
दसरा म्हणजे सोनं वाटणं, सोनं लुटणं, एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून दिली जातात. पण प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून सोनं देणं शक्य होत नाही. पण काही हरकत नाही. तुमच्या सोन्यासारख्या माणसांना मेसेजमधून दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा पाठवा. जेणेकरून तुमच्या सोन्यासारख्या माणसांची दसरा खऱ्या अर्थाने सोन्यासारखा होईल.
advertisement
आश्विन शुद्ध दशमीला, सण हा येतो दसरा. हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा, होई चेहरा सर्वांचा हसरा, Happy Dasara
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
हॅप्पी दसरा
advertisement
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा…
निसर्गाचं दान आपट्याचं पान
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
advertisement
सण दसरा विजयाचा,
रावणास दहन करण्याचा,
सरस्वती पूजन करून,
शुभेच्छा एकमेकांना देण्याचा
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
दसरा!
advertisement
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!
झेंडूची फुले केशरी,
advertisement
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं. आपणास व आपल्या परिवारास, विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दसरा
सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
हॅप्पी दसरा
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे, हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे, विजयादशमीच्या शुभेच्छा…
झाली असेल चूक जरी,
या निमित्ताने तरी ती विसरा,
वाटून प्रेम एकमेकांस,
साजरा करु यंदाचा हा दसरा!
दसऱ्याच्या शुभेच्छा
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लुटूया सोने आनंदाचे,
विचारांचे करू सीमोल्लंघन..
होईल आज दसरा साजरा,
कुप्रथांचे करूया उल्लंघन…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Dussehra Wishes : आला आला दसरा! सोन्यासारख्या माणसांना सोन्यासारख्या दसऱ्याच्या शुभेच्छा
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement