Diwali : दिवाळीत शुगर - बीपीकडे दुर्लक्ष नको, गोड खाणं पडेल महागात, या टिप्स लक्षात ठेवा

Last Updated:

सणांच्या काळात जास्त खाणं आणि गोड पदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं, ज्यामुळे थकवा, डिहायड्रेशन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, दिवाळीत आहाराचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

News18
News18
मुंबई : दिवाळी म्हणजे फराळ, खमंग आणि गोड पदार्थांची रेलचेल. हे पदार्थ या दिवसांत खाण्याची मजा काही औरच असते. पण भरपूर तेल आणि साखरेनं वजनही वाढतं. आणि त्यातून जर मधुमेह असेल तर हा जास्त गोडवा तुमच्यासाठी समस्या बनू शकते.
सणांच्या काळात जास्त खाणं आणि गोड पदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं, ज्यामुळे थकवा, डिहायड्रेशन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, दिवाळीत आहाराचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
मधुमेहींनी दिवाळीत कशी काळजी घ्यायची यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स. जेणेकरून दिवाळीच्या आनंदात तब्येतीची चिंता न करता सणाचा पूर्णपणे आनंद घेता येईल.
advertisement
गोड पदार्थ टाळा - आवडते आणि त्यातून गोड पदार्थ खाऊ नका म्हटल्यावर वाईट वाटू शकतं. पण जर तब्येतीकडे लक्ष द्यायचं असेल तर ही काळजी घ्यायला हवी. रसगुल्ला, बर्फी आणि गुलाब जामुन सारख्या जास्त साखर असलेल्या गोड पदार्थांमुळे रक्तातील साखर लवकर वाढू शकते. याऐवजी, खजूर किंवा गुळापासून बनवलेले गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. बेसनाचे लाडू किंवा सुक्या मेव्यापासून बनवलेल्या गोड पदार्थ हे चांगले पर्याय आहेत. गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर ते कमी प्रमाणात खा आणि नंतर हलकं फिरायला जा.
advertisement
जेवणाच्या वेळा, प्रमाण ठरवा - दिवाळी म्हटलं की घरी पाहुणे आले म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत खाणं टाळा. कारण वारंवार नाश्ता करणं किंवा रात्री उशिरा खाण्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडू शकतं. हे टाळण्यासाठी, ठरलेल्या वेळी जेवा आणि प्रमाणात जेवा.
advertisement
अधूनमधून उपवास किंवा आहारातील नियंत्रणामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण सुधारण्यास मदत होऊ शकते.
फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा - केवळ कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकं किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका. सॅलड, डाळी आणि अंकुरलेलं धान्य यासारखे फायबर आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यावर भर द्या. जेवणापूर्वी एक वाटी सॅलड खाल्ल्यानं जास्त खाणं टाळता येतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : दिवाळीत शुगर - बीपीकडे दुर्लक्ष नको, गोड खाणं पडेल महागात, या टिप्स लक्षात ठेवा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement