Health Tips : लेझरने हेअर रिमूव्ह करताय? आधी फायदे आणि तोटे पाहाच Video

Last Updated:

वॅक्सिंगला पर्याय म्हणून सध्याला लेझरने हेअर रिमूव्ह करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

+
News18

News18

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्या शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी पूर्वीपासून वॅक्सिंग हा एक पर्याय आहे. पण वॅक्सिंग करताना आपल्याला त्रास सहन करावा लागतो. या वॅक्सिंगला पर्याय म्हणून सध्याला लेझरने हेअर रिमूव्ह करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मात्र, लेझरने हेअर रिमूव्ह करण्याची योग्य पद्धत कोणती? लेझरने हेअर रिमूव्ह केल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावरती काही परिणाम होतात का? याविषयीच छत्रपती संभाजीनगरमधील कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी माहिती दिली आहे. 
advertisement
लेझरने हेअर रिमूव्ह करण्याची योग्य पद्धत कोणती?
लेझरने हेअर रिमूव्ह करण्यासाठी आयपीएल नावाच्या लाईटने देखील करता येते. याला इंटेल्स पल्स लाईट असे देखील म्हणतात. दुसरा म्हणजे डायर लेझरने देखील अनावश्यक केस हे काढता येतात. या सर्व लेझर ट्रीटमेंट या अर्ध्या ते एक तासांमध्ये पूर्ण होतात. म्हणजे तुम्हाला किती केस काढायचे याच्यावरती ते अवलंबून असतात. या ट्रीटमेंट चार ते पाच स्टेजमध्ये कराव्या लागतात. एका महिन्यामध्ये चार ते पाच सेटिंग करून हे सर्व केस काढता येतात. हवं तर वर्ष किंवा सहा महिन्यांमध्ये देखील एक याचा सेशनही घ्यावा लागतो, असं डॉ. रमाकांत बेंबडे सांगतात. 
advertisement
लेझरने हेअर काढणं अत्यंत स्वस्त दरामध्ये होतं यासाठी जास्त खर्च देखील येत नाही. विशेष म्हणजे हे पेन लेस असल्यामुळे देखील पटकन होतं. सध्याला लेझर हेअर रिमूव्हची अ‍ॅडव्हान्स टेक्निक ही आलेली आहे. यामुळे ते अत्यंत सेफ आहे यामुळे कोणताही परिणाम हा आपल्या शरीरावरती होत नाही. पण हे तुम्ही एखाद्या तज्ज्ञांकडून किंवा स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरांकडूनच करून घ्यायला पाहिजे. 
advertisement
गर्भवती महिलांना निःशुल्क सेवा देणारे रुग्णालय; माता आणि बालकांना ठरतंय संजीवनी, पाहा Video
ज्यांचा सावळा रंग आहे त्यांना कधी कधी सुपर स्पेशल बर्न हे होऊ शकतात. ते एक चार-पाच दिवसांमध्ये लगेच निघून सुद्धा जातात. लेझर हेयर रिमूव्ह केल्यानंतर त्यावरती तुम्ही काळजी घेताना सनस्क्रीम लोशनचा वापर हा करावा. ही काळजी रुग्णांनी घ्यायला पाहिजे, असं डॉ. रमाकांत बेंबडे सांगतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : लेझरने हेअर रिमूव्ह करताय? आधी फायदे आणि तोटे पाहाच Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement