म्हशीचे दूध आरोग्यासाठी पौष्टीक, पण थोडं संभाळून प्या! या लोकांनी चुकूनही दुधाचे करू नये सेवन
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
म्हशीचे दूध पोषणासाठी उपयुक्त असून वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, झोप सुधारण्यासाठी रात्री गरम म्हशीचे दूध उपयोगी ठरते. मात्र, ते पचनासाठी जड असल्याने पचन कमजोर असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सामान्यतः दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे. अनेकजण गायीचे दूध पितात तर काहीजण म्हशीचे दूध पितात. गाय आणि म्हैस दोन्हीचे दूध पौष्टिक असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी दोघांचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत...
म्हशीच्या दुधाचे फायदे
म्हशीचे दूध शरीराच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. म्हशीचे दूध प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. ते वजन कमी करण्यासाठी देखील चांगले मानले जाते.
म्हशीचे दूध झोपेसाठी खूप फायदेशीर
नवसारीचे आयुर्वेदिक डॉक्टर भार्गव तन्ना सांगतात की, म्हशीचे दूध झोप येण्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे, ते रात्री झोपण्यापूर्वी गरम म्हशीचे दूध पिऊ शकतात. आयुर्वेदानुसार, हे दूध झोप येण्याच्या प्रक्रियेत मदत करते.
advertisement
म्हशीचे दूध पचनास जड
डॉक्टरांनी सांगितलं की, म्हशीचे दूध पचनास जड असू शकते. त्यामुळे ज्यांची पचनक्रिया चांगली आहे, त्यांनीच या दुधाचे सेवन करावे. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हशीचे दूध अनेक आरोग्य फायदे देऊ शकते, परंतु ते व्यक्तीची शारीरिक प्रकृती आणि आरोग्यावर अवलंबून असते.
advertisement
हे ही वाचा : लाल, निळा, हिरवा, नारंगी... खरंच या रंगांचा मानसिकतेवर पाडतो प्रभाव! Color Therapy म्हणजे नेमकं काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
म्हशीचे दूध आरोग्यासाठी पौष्टीक, पण थोडं संभाळून प्या! या लोकांनी चुकूनही दुधाचे करू नये सेवन


