दररोज रात्री जेवल्यानंतर खा 2 वेलची; फायदे वाचून आजपासूनच कराल सुरूवात!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चवीपुरतं वेलचीपूड घातली तरी गोडाचा पदार्थ आणखी चवदार होतो. परंतु खरंतर वेलची ही केवळ चवीसाठी नाही, तर अन्नपचनासाठी फायदेशीर असते.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेवल्यानंतर काहीजणांना गोड खावंसं वाटतं. तर, काहीजणांना बडीशेप खाल्ल्याशिवाय अन्न पचतच नाही. तुम्हाला माहितीये का, जेवल्यानंतर वेलची खाणं हा सर्वोत्तम मुखवास मानला जातो. त्यामुळे केवळ अन्नपचन व्यवस्थित होत नाही, तर आरोग्याला इतरही फायदे मिळतात.
चवीपुरतं वेलचीपूड घातली तरी गोडाचा पदार्थ आणखी चवदार होतो. परंतु खरंतर वेलची ही केवळ चवीसाठी नाही, तर अन्नपचनासाठी फायदेशीर असते. वेलचीचे नुसते 2 दाणेही उपयुक्त ठरतात.
advertisement
अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी वेलची गुणकारी असते. वेलचीच्या बियांमध्ये आणि तेलातसुद्धा विविध औषधी गुणधर्म असतात. डायट टू नरिशच्या फाउंडर प्रियंका जयस्वाल सांगतात, वेलची हा नैसर्गिक मुखवास आहे. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
वेलची खाल्ल्याने पचनशक्तीही भक्कम होते. वेलचीत अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे विविध आजारांपासून मुक्ती मिळते. विशेषतः झोप उत्तम लागते. असं म्हणतात की, दम्याच्या रुग्णांसाठी वेलची फायदेशीर ठरते.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
August 02, 2024 5:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
दररोज रात्री जेवल्यानंतर खा 2 वेलची; फायदे वाचून आजपासूनच कराल सुरूवात!