advertisement

Tadgola Benefits : उष्णतेच्या काळामध्ये शरिराला थंडावा, ताडगोळे खाण्याचे फायदे अनेक, जालन्यात मागणी वाढली, Video

Last Updated:

Tadgola Benefits : वाढत्या उष्णतेमध्ये नारळ पाणी घेण्याला अधिक प्राधान्य नागरिक देत असतात. याचबरोबर ताडगोळे हे देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जातात.

+
ताडगोळे

ताडगोळे

जालना : वाढत्या उष्णतेमध्ये नारळ पाणी घेण्याला अधिक प्राधान्य नागरिक देत असतात. याचबरोबर ताडगोळे हे देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. जालना शहरामध्ये पालघर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्यांची आवक होत आहे. जालन्यातील नागरिकांचा देखील या ताडगोळ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. हे ताडगोळे उष्णतेच्या काळामध्ये शरिराला थंडावा देण्याचे काम करतात. तसेच अनेक पोषक तत्वांनी देखील हे भरपूर असतात. पाहुयात काय आहेत ताडगोळ्यांची वैशिष्ट्ये आणि जालना शहरामध्ये याची विक्री कशा पद्धतीने सुरू आहे.
इंग्रजीमध्ये आईस ॲपल या नावाने ताडगोळ्याला ओळखले जातो. अतिशय टणक असणाऱ्या पाम वृक्षाला येणारे हे फळ आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही फळे येतात. ताडगोळ्याच्या एका फळांमध्ये तीन पांढरे शुभ्र मऊशार असे गोळे निघतात. चवीला गोडसर आणि नारळाप्रमाणे हे गोळे असतात.
advertisement
ताडगोळे खाण्याचे शरिराला अनेक फायदे आहेत. वाढत्या उष्णतेमध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये ताडगोळे खाण्याला विशेष प्राधान्य दिले जातं. पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने आणि शरिराला थंडावा देत असल्याने उष्माघातापासून बचाव होतो. ताडगोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 12 असल्याने शरिराला असंख्य फायदे होतात. ताडगोळे खाल्ल्याने शरिराची पचनक्रिया सुधारतेत्याचबरोबर ऍसिडिटीबद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
advertisement
मधुमेह असलेल्या रुग्णांना देखील प्रमाणात ताडगोळे सेवन केल्यास फायदा होतो. त्वरित ऊर्जेचा स्रोत म्हणून उन्हाळ्यामध्ये ताडगोळ्याला सर्वाधिक मागणी असतेशहरामध्ये या ताडगोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून ताडगोळ्याच्या स्टॉल भोवती नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे पाहायला मिळतंय. 100 रुपयाला दोन फळे अशा पद्धतीने या ताडगोळ्यांची विक्री होत असून एका फळांमध्ये साधारणपणे तीन ताडगोळे निघतात, असं विक्रेते मोहंमद अली यांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tadgola Benefits : उष्णतेच्या काळामध्ये शरिराला थंडावा, ताडगोळे खाण्याचे फायदे अनेक, जालन्यात मागणी वाढली, Video
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement