Mango Juice : आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करताय? चांगलं की वाईट? Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
काहीजण आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर हा करतात. पण आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करावा किंवा करू नये? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबे खायला सर्वांनाच आवडतात. तसंच आंब्याचा रस खायला देखील खूप आवडतो. पण काहीजण आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर हा करतात. पण आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करावा किंवा करू नये? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
कुठले फळ जर तुम्हाला खायचं असेल तर ते फळ नुसतं खावं. त्यामध्ये दुधाचा वापर हा करू नये. आंबा हा थोडासा आंबट असतो आणि दुधात जर टाकला तर ते दूध नासतं. त्यामुळे आंब्याचा रस करताना त्यामध्ये दुधाचा वापर नाही केला तर ते चांगलंच आहे, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
जर तुम्हाला आंब्याच्या रसामध्ये दूध आवडत असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात दुधाचा वापर करू शकता. जर तुम्हाला आंब्याच्या रसामध्ये दूध टाकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एकदम गोड असा आंबा घ्यावा त्यामध्ये थोडाही आंबटपणा नसावा. एकदम गोड आंबा जर घेतला आणि त्यामध्ये जर तुम्ही थोड्या प्रमाणात दूध घातलं तर ते चालतं. त्याचा परिणाम हा जास्त होत नाही, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
तसंच ज्यांना मधुमेह आहे किंवा हृदयविकार आहे अशांनी तर आंब्याचा रस हा बिना दूध न घालता घ्यावा. नुसताच तुम्ही आंब्याचा रस हा घेऊ शकता किंवा नुसते आंबे तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला आंब्याचा रस खायचा असेल तर तो तुम्ही शक्यतो बिना दूध घालताच खावा. म्हणजेच की त्याचा कुठलाही परिणाम हा तुमच्या शरिरावर होणार नाही, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 06, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Mango Juice : आंब्याचा रस करताना दुधाचा वापर करताय? चांगलं की वाईट? Video









