Summer Diet : तेलकट पदार्थांना करा बाय बाय, उन्हाळ्यात पचनसंस्थेवरचा ताण असा टाळा

Last Updated:

तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांमुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. म्हणून, ज्याप्रमाणे आपण ऋतूनुसार आपल्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं बदलतो, त्याचप्रमाणे आपण आपला आहार देखील बदलला पाहिजे.

News18
News18
मुंबई: उन्हाळ्यात आपली पचनशक्ती म्हणजेच पचनसंस्था अशक्त होते, अशावेळी संतुलित आहार घेणं आणखी महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात उष्माघात, अतिसार आणि उलट्या असा त्रास होऊ शकतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांमुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. म्हणून, ज्याप्रमाणे आपण ऋतूनुसार आपल्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं बदलतो, त्याचप्रमाणे आपण आपला आहार देखील बदलला पाहिजे. म्हणूनच, उन्हाळ्यात अशक्त झालेल्या पचनसंस्थेसाठी संतुलित आहार घेणं आणखी महत्त्वाचं आहे.
आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,
- उन्हाळ्यात मसालेदार अन्न खाऊ नये - मसालेदार अन्नामुळे शरीर डिहायड्रेट होतं.
- उन्हाळ्यात चयापचयाचा वेग कमी होतो, याचा आपल्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो.
- उन्हाळ्यात जास्त खाल्लं तर पोट फुगणं, आम्लपित्त अशा पोटाशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.
advertisement
- या समस्या टाळण्यासाठी, उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं रक्तदाबावरही परिणाम होतो.
- उन्हाळ्यात गोड पदार्थ खाऊ नयेत कारण यामुळे शरीर डिहायड्रेट होतं.
- उन्हाळ्यात काहींचं वजनही खूप वाढतं कारण, उष्णतेपासून वाचण्यासाठी शेक प्यायला जातो पण त्यात भरपूर साखर असते.
- या ऋतूत थंड पेय पिण्याचं प्रमाण खूप वाढतं. यातल्या साखरेमुळे वजन वाढतं. शेकमध्ये साखर असेल तर पिणं टाळा.
advertisement
- बाहेर उपलब्ध असलेल्या शेकमध्ये कोणत्या प्रकारचं दूध वापरलं जात याविषयी माहिती नसते, बऱ्याचदा त्यात मिश्रित रंग वापरले जातात.
- या दिवसात बाहेरचं अन्न खाल्ल्यानं वजन तर वाढेलच पण पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
- उन्हाळ्यात सॅलड खाणं प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात, आहारात फायबर खाण्याचं प्रमाणं वाढवावं. सॅलडद्वारे शरीरात द्रवपदार्थ जातील.
advertisement
- ऋतू कोणताही असो, हंगामी भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. तसंच अन्न शिजवताना त्यात जास्त मीठ आणि साखर वापरू नये असा सल्लाही डॉक्टर देतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Diet : तेलकट पदार्थांना करा बाय बाय, उन्हाळ्यात पचनसंस्थेवरचा ताण असा टाळा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement