Cloves : केसांच्या समस्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, केसांची मुळं होतील मजबूत

Last Updated:

लवंग हा फक्त साधा मसाला नाही तर केसांची काळजी घेण्यासाठी एक चांगला नैसर्गिक मार्ग आहे. याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि केसांची मुळं यामुळे मजबूत होतात. केस गळत असतील, कोंडा झाला असेल किंवा केस पातळ होत असतील तर लवंगांचं पाणी हा एक उत्तम उपाय ठरु शकतो.

News18
News18
मुंबई : केसांची वाढ, काळजी, टाळूची स्वच्छता, केसांची मुळापासूनची मजबुती यासाठी अनेक उत्पादनं आहेत. पण स्वयंपाकघरात असलेला एक छोटासा मसाला केसांच्या या समस्या दूर करण्यास मदत करतो. केसांच्या  निरोगी आरोग्यासाठी लवंगांचं पाणी हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
लवंग हा फक्त साधा मसाला नाही तर केसांची काळजी घेण्यासाठी एक चांगला नैसर्गिक मार्ग आहे. याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि केसांची मुळं यामुळे मजबूत होतात. केस गळत असतील, कोंडा झाला असेल किंवा केस पातळ होत असतील तर लवंगांचं पाणी हा एक उत्तम उपाय ठरु शकतो.
advertisement
लवंग केसांसाठी का फायदेशीर आहे ?
लवंगांमध्ये केसांच्या वाढीला प्रोत्साहन देणारे अनेक घटक असतात.
- अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि टाळूला पोषण मिळतं.
- बुरशीविरोधी घटकांमुळे कोंडा आणि खाज सुटणं यासारख्या समस्या कमी होतात.
advertisement
- रक्ताभिसरण वाढवण्याची क्षमता असल्यानं मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि केस मजबूत होतात.
- नवीन केसांच्या वाढीची प्रक्रिया वेगवान होते.
- लवंगांच्या पाण्याचा योग्य वापर कसा करावा ?
- एका पॅनमध्ये दोन कप पाणी घ्या आणि ते उकळण्यासाठी ठेवा.
- पाणी उकळू लागलं की त्यात दोन चमचे लवंगा घाला.
- पाणी मंद आचेवर 5-7 मिनिटं उकळवा, जेणेकरून लवंगांमधले सर्व पोषक घटक त्यात विरघळतील.
advertisement
- गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या आणि रात्रभर तसंच राहू द्या.
- दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाळून स्वच्छ बाटलीत भरा.
केसांना लवंगांचं पाणी लावण्यासाठी केस शाम्पूनं धुवा. यानंतर, हळूहळू लवंगांचं पाणी टाळू आणि केसांच्या मुळांमध्ये हळूहळू लावा. बोटांनी हलक्या हातानं मसाज करा, यामुळे टाळूमध्ये चांगलं शोषलं जाईल. आता तुमचे केस साध्या पाण्यानं धुवा आणि टॉवेलनं हलक्या हातानं वाळवा.
advertisement
लवंगाचे पाणी वापरण्याचे फायदे -
केसांची मुळं मजबूत होतात. कोंडा आणि खाज सुटणं यासारख्या समस्या कमी होतात. केस गळणं हळूहळू कमी होतं. टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते.
advertisement
या टिप्स लक्षात ठेवा -
त्वचा संवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट करा. हे पाणी वापरताना डोळे जपा. पाणी चुकून डोळ्यांत गेलं तर डोळे जळजळतील. याचा वापर जास्त करु नका, आठवड्यातून फक्त 2-3 वेळा वापरा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cloves : केसांच्या समस्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, केसांची मुळं होतील मजबूत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement