दुधाचा नाही, चहा प्यावा तर असा...! मूड होतो फ्रेश, आरोग्य राहतं उत्तम

Last Updated:

Healthy tea recipes : आपण नेहमीच्या चहापेक्षा इतर पदार्थांचा चहा बनवून पिऊ शकता. ज्यामुळे आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी हा चहा फायदेशीर.
वजन कमी करण्यासाठी हा चहा फायदेशीर.
काजल मनोहर, प्रतिनिधी
जयपूर : अति चहा न पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ वारंवार देतात. शिवाय दिवसाची सुरूवात चहाने केल्यास आरोग्याचे हाल होतात, असं म्हणतात. परंतु अनेकजणांचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही. तर, काहीजणांना दिवसभरातून 2-3 कप चहा लागतोच.
जर आपल्यालाही चहाची फार सवय असेल, तर त्याला पर्याय शोधावा. आपण नेहमीच्या चहापेक्षा इतर पदार्थांचा चहा बनवून पिऊ शकता. ज्यामुळे आपलं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
advertisement
दालचिनीचा चहा :
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं, असं म्हणतात. दालचिनीत विविध अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपण ऊर्जावान राहू शकता. कपभर गरम पाण्यात चमचाभर दालचिनी पावडर घालून आपण हा चहा बनवू शकता. त्यात मध घालून प्यायल्यास उत्तम.
मेथीचा चहा :
वजन कमी करण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. मेथीमुळे शरिरात उब निर्माण होते, परिणामी फॅट जळून जातात. म्हणूनच मेथीचे दाणे पाण्यात भिजवून प्यायल्यास वजन कमी होतं असं म्हणतात. विशेष म्हणजे यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. झोपण्यापूर्वी अर्धा किंवा 1 तास आधी मेथीच्या दाण्यांची पूड गरम पाण्यात भिजवून आपण पिऊ शकता.
advertisement
हळदीचा चहा :
सर्वात आधी 2 कप पाणी उकळून घ्यावं. यात चमचाभर हळद मिसळावी. हे पाणी 2 ते 3 मिनिटं उकळवून एका कपात घ्यावं. त्यात मध आणि काळीमिरी पावडर घालून पिऊ शकता. हा चहा दररोज नाश्त्याच्या आधी पिण्याचा सल्ला दिला जातो.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
दुधाचा नाही, चहा प्यावा तर असा...! मूड होतो फ्रेश, आरोग्य राहतं उत्तम
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement