health tips : छातीत होतेय जळजळ, अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण...; वाचा महत्त्वाची माहिती

Last Updated:

एखाद्या व्यक्तीला अनेक तास छातीत जळजळ होत असेल, काहीही गिळताना त्रास किंवा वेदना जाणवत असेल, जर शरीराचे वजन अचानक कमी होत असेल आणि तीव्रपणे गळा बसत असेल तर ही लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी : छातीत जळजळ होण्याची समस्या अनेकांना जाणवत असते. मात्र, अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. ही समस्या काही मिनिटांपासून कित्येक तासांपर्यंत असते. लोक हा त्रास किरकोळ समजून औषध घेतात. मात्र, कधीकधी छातीत जळजळ होणे देखील गंभीर रोग असू शकतो. छातीत जळजळ होण्याची समस्याही कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटका येण्याची चिन्ह असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
याबाबत उत्तरप्रदेशातील झाशी येथील जिल्हा रुग्णालयातील छातीचे आजार विशेषज्ञ डॉ. डी.एस.गुप्ता यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीला अनेक तास छातीत जळजळ होत असेल, काहीही गिळताना त्रास किंवा वेदना जाणवत असेल, जर शरीराचे वजन अचानक कमी होत असेल आणि तीव्रपणे गळा बसत असेल तर ही लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत.
advertisement
कधीकधी हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण देखील असते. अनेक वेळा हृदयातील वेदनांचा परिणाम खांद्यावर आणि मानेपर्यंत पोहोचतो. म्हणून, कोणतेही औषध घेण्यापूर्वी, एक चाचणी करणे आवश्यक आहे. डॉ. डी.एस. गुप्ता यांना वैद्यकीय क्षेत्रातील 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
कर्करोगाचीही शक्यता -
ते पुढे म्हणाले की, छातीत जळजळ संबंधित समस्या कधीकधी घशात किंवा पोटात कर्करोगाचे कारण असू शकतात. पोटात वाहणारे आम्ल अनेकदा ऊतींचे नुकसान करते. यासोबतच हर्निया आणि अल्सरसारखे आजारही यामुळे होऊ शकतात. अशा परिस्थितीत छातीत जळजळ, उलट्या किंवा इतर कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कुणीही छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नये.
मराठी बातम्या/हेल्थ/
health tips : छातीत होतेय जळजळ, अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण...; वाचा महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement