advertisement

Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? या घरगुती उपायांचा वापर करा, लगेच येईल तरतरी...

Last Updated:

हवामान बदलामुळे होणारा थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी गिलोय, तुळस आणि पपईच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करा. गिलोयचा रस थकवा कमी करतो, तुळशीचा रस पचन सुधारतो आणि पपई प्लेटलेट्स वाढवते. हे उपाय सोपे, घरच्या घरी करता येणारे असून साइड इफेक्टही होत नाहीत.

News18
News18
हवामान बदलानंतर थकवा, अनिद्रा आणि अशक्तपणामुळे त्रास होतो. यामुळे घाबरण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे. काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण शरीर फिट ठेवू शकतो आणि या समस्या सोडवू शकतो. हे उपाय अगदी सहज घरच्या घरी करता येतात आणि यासाठी जास्त खर्चही होत नाही.
राधेश्याम सत्यप्रकाश हॉस्पिटलमध्ये 15 वर्षांपासून कार्यरत असणारे बीएमएस डॉक्टर मनोज तिवारी यांनी Local18 शी बोलताना सांगितलं की, खालील घरगुती उपायांमुळे शरीरातील पोषकतत्त्वांची कमतरता दूर होते. या उपायांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे उपाय करता येतात, त्यामुळे शरीर निरोगी राहते.
advertisement
गुळवेल वनस्पती शरीर फिट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. गुळवेलचा रस उकळून प्यायल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. तसेच, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गुळवेलच्या नियमित सेवनाने आपण निरोगी राहू शकतो.
तुळशीसारखी औषधी वनस्पती प्रत्येक घराजवळ सापडते. तुळशीचा रस, पानं आणि काढा यामुळे शरीरातील पचनतंत्र मजबूत होतं. याशिवाय, एसिडिटी, थकवा, मानसिक तणाव आणि चिंता यावरही तुळशीचा उपयोग होतो. तुळशीचा नियमित वापर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
advertisement
पपईचा रस आणि पानं शरीरातील प्लेटलेट्सची कमतरता भरून काढतात. प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा वाढवण्यासाठी पपईचा उपयोग होतो. याशिवाय, पपईचा रस देखील अनेक आजारांवर प्रभावी ठरते
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? या घरगुती उपायांचा वापर करा, लगेच येईल तरतरी...
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement