पिंपल्स असलेल्या त्वचेची हिवाळ्यात काळजी कशी घ्यायची? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

हिवाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यात जर चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर आणखी त्रास होतो. त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. त्यानंतर पिंपल्स आणखी वाढतात, त्यामुळे हिवाळ्यामध्ये पिंपल्स असलेल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळा म्हटलं की सगळ्यांना काळजी वाटते ती म्हणजे त्वचेची. कारण हिवाळ्यात त्वचा सतेज दिसणं खूप कठीण आहे. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते. ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात, त्यांना तर अधिक काळजी घेणं गरजेचं असते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि त्याला खाज सुटते. त्यामुळे पिंपल्स वाढतात. त्यामुळे पिंपल्स असलेल्या त्वचेची हिवाळ्यात योग्य काळजी घेणे गरजेचे असते. याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
त्वचेची हिवाळ्यात काळजी कशी घ्यायची?
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी चर्चा गेली असता त्या सांगतात की, पिंपल्स असलेली त्वचा म्हणजेच तेलकट त्वचा. जास्तीत जास्त पिंपल्स हे तेलकट त्वचेवर येतात. त्वचा तेलकट असली तरीही हिवाळ्यात ती कोरडी पडते. आपण जेव्हा चेहरा पाण्याने वॉश करतो. तेव्हा हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होऊन ऑईल सिक्रेट करते. त्यामुळे त्वचा आणखी तेलकट होते. अनेक लोकांचा गैरसमज आहे की तेलकट त्वचा असल्याने त्यावर मॉइश्चरायझर लावायचे नाही. पण, त्वचा कोणत्याही प्रकारची असो हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे.
advertisement
तेलकट त्वचेसाठी सिरॅमाईट्स आणि एलोवेरा असलेले मॉइश्चरायजर उत्तम असतात. त्याचबरोबर ऑईल फ्री आणि ग्लिसरीन फ्री मॉइश्चरायझर सुद्धा हिवाळ्यासाठी बेस्ट असतात. त्याचबरोबर हिवाळ्यात फेसवॉश हा कमी वापरावा. म्हणजेच उन्हाळ्यात जर 2 वेळा फेसवॉश वापरत असेल तर हिवाळ्यात 1 वेळाच वापरावा आणि इतर वेळेस पाण्याने चेहरा धुवावा. कारण पिंपल्स आलेल्या त्वचेसाठी वापरतात त्या फेस वॉशमधील कंटेंट त्वचा कोरडी करतात.
advertisement
हिवाळ्यात पिंपल्ससाठी क्रीम वापरतांना जेल बेस वापरावी. जेणेकरून त्वचा कोरडी होणार नाही. ज्या क्रीममुळे त्वचेचा ओलावा टिकून राहील आणि त्वचा मुलायम राहील अशा क्रीम वापराव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात केसातील कोंड्याचे प्रमाण खूप जास्त वाढते. त्यामुळे सुद्धा पिंपल्स वाढतात, त्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे. केसातील कोंडा घालवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू वापरू शकता. त्यामुळे केसातील कोंडा कमी होईल आणि पिंपल्स येणार नाहीत, असं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितलं.
advertisement
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पिंपल्स असलेल्या त्वचेची हिवाळ्यात काळजी कशी घ्यायची? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement