लठ्ठपणा कमी करायचाय? गुळाचा चहा ट्राय करा, फायदे पाहाल तर रोज प्याल, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दूध आणि साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीर ठरतोय असे विविध अभ्यासातून समोर आले आहे.
धाराशिव, 22 नोव्हेंबर: चहा हे जणू भारतीयांचं राष्ट्रीय पेय आहे. आपल्याकडे चहाशिवाय सहसा कुणाची सकाळ होतच नाही. परंतु, शुगर आणि इतर आजारांमुळे अनेकदा साखरेचा चहा पिणं बंद करावं लागतं. मात्र, गुळाचा आरोग्यदायी चहा आपण ट्राय केला तर आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत. दूध आणि साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीर ठरतोय असे विविध अभ्यासातून समोर आले आहे. याबाबतच धाराशिव येथील आहार तज्ज्ञ डॉ. चेतन बोराडे यांनी माहिती दिली आहे.
गूळ हा आरोग्यासाठी फायदेशीर असून अन्न पचन करण्यास मदत करतो. 'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन'च्या अभ्यासानुसार गुळात असे अनेक घटक आढळतात जे शरीराला रोगांशी लढण्याची क्षमता देतात. तर गुळाचे औषधी गुण पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. गुळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माणसाचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त कॅलरीज देखील बर्न करु शकतो, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
गुळाचा चहा आरोग्यदायी
गुळात व्हिटॅमिन-ए, बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी अनेक प्रकारचे सूक्ष्म पोषक घटक आढळतात. त्यामुळे जर तुम्ही गुळाचा चहा प्यायला तर ते तुमच्या रक्तासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळेच गुळाच्या चहाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्याचबरोबर गुळाचा चहा आरोग्याला फायदेशीर ठरताना पाहायला मिळतोय.
advertisement
गुळाचे औषधी गुण पचनशक्ती वाढवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात. गुळात भरपूर कॅलरीज असतात. तसेच गूळ शरीरात पाचक म्हणून काम करतो. गूळ खाल्ल्यानंतर किंवा गुळाचा चहा प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. तसेच माणसाचे वजन कमी करण्यासही ते खूप उपयुक्त ठरते, असेही डॉक्टर सांगतात.
advertisement
गुळाच्या चहाला मोठी मागणी
गुळाच्या चहाचे महत्त्व समजल्यामुळे अलिकडे या चहाची मागणी वाढली आहे. आता गुळाच्या चहाची विक्री केंद्रे दिसत आहेत. तसेच हॉटेलमध्येही गुळाचा चहा उपलब्ध होतो. त्यामुळे चहा प्यायचाच असेल तर गुळाच्या चहाला पसंती द्यावी, असे आहार तज्ज्ञ सांगतात.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
November 22, 2023 10:58 AM IST