पुण्याची हवा विषारी? धक्कादायक आकडेवारी समोर, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विशेषता वाकड आणि हिंजवडी परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, येथील रहिवाशांना श्वसनविकार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील काही भागांत अतिखराब हवामानाची नोंद झाली आहे. विशेषता वाकड आणि हिंजवडी परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, येथील रहिवाशांना श्वसनविकार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2025 सालच्या वर्षात पुण्यात श्वसनसंसर्ग आणि इन्फ्लुएन्झासदृश आजाराचे तब्बल 41 हजार 513 रुग्ण नोंदवले गेले आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी डॉ. अविनाश लांब यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
डॉ. अविनाश लांब यांनी सांगितले की, पुणे शहरात वेगाने आधुनिकीकरण होत आहे. शहरात वाहनांची संख्या खूप वाढली आहे. अनेक भागांत मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे शहरातील प्रदूषणाचा विळखा वाढत चालला आहे. हिवाळ्यात या प्रदूषणाचा त्रास अधिक जाणवतो. जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळात पुण्यात विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. श्वसनसंसर्ग आणि फ्लूसदृश आजारांचे 41,513 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तीव्र अतिसाराचे 9,005 रुग्ण आढळले आहेत. तसेच विषाणूजन्य कावीळचे 133, टायफॉईडचे 212 आणि लेप्टोस्पायरोसिसचे 21 रुग्ण नोंदले गेले आहेत. कॉलऱ्याचा एक रुग्णही आढळून आला आहे.
advertisement
काय काळजी घ्यावी?
डॉ. अविनाश लांब यांनी सांगितले की, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा. शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा थंडीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे. कोणालाही श्वसनाचा त्रास, खोकला, ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हातांची स्वच्छता कायम राखावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 3:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पुण्याची हवा विषारी? धक्कादायक आकडेवारी समोर, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला








