मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेताय? जरा थांबा! डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्याल, तर उद्भवतील या भयंकर समस्या
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मल्टीविटॅमिन टॅब्लेट्स शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. अयोग्य वापरामुळे जडपण, यकृत समस्या, किडणीचे आजार आणि विषबाधा होऊ शकतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे अधिक सुरक्षित आहे.
आधुनिक जीवनशैलीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. तरुणांनाही वृद्धापकाळातील समस्या जाणवत आहेत. यापासून बचाव करण्यासाठी अनेकजण वेळोवेळी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेत आहेत. मल्टीव्हिटॅमिनचा ट्रेंड सध्या खूप वाढला आहे, अनेकजण शरीर बनवण्यासाठीही या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मल्टीव्हिटॅमिन शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे पुरवतात, पण जेव्हा आहारातून पुरेसे पोषक तत्वे मिळत नाहीत, तेव्हाच त्या घेणे योग्य आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे योग्य नाही, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. आज आपण मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांमध्ये काय असते आणि गरज नसताना या औषधे घेतल्याने काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया...
पूरक... पण डाॅक्टरांच्या सल्लानेच घ्या
गाझियाबादमधील कवी नगर येथील 'रंजनाज न्यूट्रिग्लो क्लिनिक'च्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांनी 'न्यूज18'ला सांगितले की, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या एक प्रकारचे आहारातील पूरक आहेत, ज्यात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते आणि आहारातून ती भरून काढता येत नाही, तेव्हा डॉक्टर मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. मल्टीव्हिटॅमिन शरीरात प्रवेश करून पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करतात आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. मात्र, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात, अन्यथा ते आरोग्यासाठी गंभीर नुकसान करू शकतात.
advertisement
निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या
आहारतज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांची गरज नसते. जर तुमचा आहार संतुलित असेल आणि त्यात फळे, भाज्या, बिया आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल, तर तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनची गरज भासणार नाही. अशा स्थितीत, जर तुम्ही स्वतःहून मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे सुरू केले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मल्टीव्हिटॅमिनमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असतात. हे व्हिटॅमिन चरबीमध्ये विरघळणारे असतात आणि त्यांचे जास्त प्रमाण घेतल्यास यकृत खराब होणे, किडनीच्या समस्या, मळमळ आणि विषबाधा यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
advertisement
सप्लिमेंट्सऐवजी घ्यावा पौष्टिक आहार
रंजना सिंह म्हणाल्या की, जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणताही आजार असेल, तर डॉक्टरांचा सल्ला न घेता मल्टीव्हिटॅमिन घेणे हानिकारक असू शकते. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच मल्टीव्हिटॅमिन घ्यावे, कारण हे सप्लिमेंट्स स्वतःहून घेतल्यास किडनी स्टोनसह अनेक समस्यांचा धोका वाढू शकतो. लोकांनी सप्लिमेंट्सऐवजी पौष्टिक आहार घ्यावा. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या पोषक तत्वे मिळतात.
advertisement
गर्भवती महिलांना मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज, पण...
तज्ज्ञांच्या मते, वृद्ध, स्तनपान देणाऱ्या माता, गर्भवती महिलांसह अनेक लोकांना मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेण्याची गरज असते, पण त्यांनी ही सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मल्टीव्हिटॅमिनच्या अनेक प्रकारच्या गोळ्या असतात आणि त्यांचे डोस देखील लोकांच्या वैद्यकीय स्थितीनुसार ठरवले जातात. जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाण घेतले, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असेल. मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या जेवणानंतर घ्याव्यात आणि नेहमी पाण्यासोबतच घ्याव्यात. या गोळ्या ज्यूस किंवा कोल्ड ड्रिंक्ससोबत घेणे हानिकारक असू शकते.
advertisement
हे ही वाचा : हातापायाला मुंग्या अन् चालताना त्रास, GBS आजाराची नेमकी लक्षणे काय? कशी घ्यावी काळजी? Video
हे ही वाचा : डाव्या की उजव्या... रात्री कोणत्या कुशीवर झोपावं? गरदोर महिलांसाठी ही बाजू योग्य, हे आहेत 5 मोठे फायदे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेताय? जरा थांबा! डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्याल, तर उद्भवतील या भयंकर समस्या