थंडीत 'हा' आजार झाला, पचनसंस्थेवर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हिवाळ्यात पचनतंत्रावर परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये जीआय ट्रॅक्ट इन्फेक्शन सामान्य आहे. हे आजार व्हायरस, बॅक्टेरिया आणि परजीवींमुळे होतात. स्वच्छता, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास त्यापासून संरक्षण मिळू शकते.
थंडीच्या मोसमात केवळ सर्दी, खोकला, घसा खवखवणे, तापच नव्हे, तर काळजी न घेतल्यास पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. होय, थंडीच्या दिवसात अनेक लोकांना पोटाच्या समस्यांचा त्रास होतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजारांचाही यात समावेश आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टशी (GI ट्रॅक्ट) संबंधित आजारांचा पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो. दिल्लीतील डॉ सुखविंदर सिंग सग्गू यांनी थंडीत गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टशी संबंधित आजारांविषयी काही विशेष गोष्टी सांगितल्या...
थंडीत गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन का होतात?
थंडीत सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनची संख्या लक्षणीय वाढते. ती सामान्यतः थंड परिस्थितीत वाढणाऱ्या विषाणू, जीवाणू आणि परजीवी जंतूंमुळे होतात. सर्वात सामान्य म्हणजे व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा ‘पोटदुखीचा फ्लू’, जो नॉरोव्हायरस आणि रोटाव्हायरसमुळे होतो. हे इन्फेक्शन दूषित अन्न, पाणी किंवा वस्तूंमुळे सहज पसरतात.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणे
जेव्हा तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन होते, तेव्हा तुम्हाला अतिसार, पोटदुखी, उलट्या यांसारखी अनेक लक्षणे जाणवू शकतात. साल्मोनेला किंवा ई. कोलायसारखे बॅक्टेरियल इन्फेक्शन खराब झालेले अन्न खाल्ल्याने होऊ शकतात. तसेच, काही लोकांमध्ये दूषित पाणी प्यायल्याने जियार्डियासिस इन्फेक्शन होऊ शकते.
advertisement
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून बचावाचे उपाय
- या इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. टॉयलेट वापरल्यानंतरही हात धुवायला विसरू नका. वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ करून हा विषाणू टाळता येतो.
- स्वच्छता लक्षात घेऊन अन्न शिजवा. लवकर खराब होणारे अन्न योग्य तापमानात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये साठवा. दूषित पाणी पिण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी फिल्टर केलेले पाणी प्या. फिल्टर नसेल तर पाणी उकळूनही पिऊ शकता.
- रोगप्रतिकारशक्ती गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन (GI इन्फेक्शन) पासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी फळे, भाज्या आणि प्रोबायोटिक्सयुक्त संतुलित आहाराचा समावेश करा. रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे.
- इन्फेक्टेड व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळा. त्यांच्या वस्तू, भांडी, रुमाल, कपडे, टॉवेल इत्यादी वापरू नका. इन्फेक्शन टाळण्यासाठी पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. लक्षणे दिसल्यास किंवा वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही थंडीत GI इन्फेक्शनचा धोका बऱ्याच अंशी कमी करू शकता आणि थंडीत स्वतःला या आजारांपासून दूर ठेवू शकता.
advertisement
हे ही वाचा : काय सांगता? डायबिटीस आणि हार्ट ॲटॅकवर गुणकारी आहे हिरवी मिरची, रोज खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे
हे ही वाचा : पोटॅटो ट्विस्टरपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगी, स्वस्तात जोगेश्वरी फुड कट्ट्यावर घ्या आस्वाद!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीत 'हा' आजार झाला, पचनसंस्थेवर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय