एनर्जी ड्रिंक्स पित आहात? तर व्हा वेळीच सावध, शरीरासाठी आहे धोकादायक
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
एनर्जी ड्रिंक घेण्याचे आपल्या शरीरावरती अनेक असे दुष्पपरिणाम होतात. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अनेक जण नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी ड्रिंक घेत असतात. पण हे एनर्जी ड्रिंक घेण्याचे आपल्या शरीरावरती अनेक असे दुष्पपरिणाम होतात. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. एनर्जी ड्रिंक घेताना काय परिणाम आपल्या शरीरावरती होतात किंवा आपण यावर कशी काळजी घ्यावी? या संदर्भातच आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
एनर्जी ड्रिंकचे शरीरावर परिणाम?
सध्याला विशेष करून मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. मुले नेहमीच एनर्जी ड्रिंक घेत असतात. पण हे एनर्जी ड्रिंक घेण्याचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावरती होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळे आपल्या हृदयावरती याचा खूप वाईट परिणाम हा होतो. यातून तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. एनर्जी ड्रिंकमध्ये गरजेपेक्षा साखर आणि कॅफिन आणि केमिकलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. यामुळे हृदयाची गती वाढते. तसेच रक्तदाब देखील वाढतो, असं डॉक्टर गणेश सपकाळ सांगतात.
advertisement
खूप घाम येतो, त्याचा वास एवढा की उलटी येते? दुसऱ्यांना त्रास देऊ नका, उपाय करा
याचं बरोबर हृदयांच्या ठोक्यामध्ये देखील अनियमित्ताता येऊ शकते. यामध्ये साखर जास्त असल्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल देखील वाढते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. तसेच फॅटी लिव्हर देखील होत आणि तुमचं वजन वाढू शकतं. यामुळे तुमच्या हाडांवर देखील याचा परिणाम होतो. कॅल्शियम कमी असल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. तुम्ही एनर्जी ड्रिंक ऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी हे घ्यायला हवं जेणेकरून तुम्हाला कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. तसंच व्यवस्थित झोप घेणे हे देखील गरजेचे आहे. ही सर्व काळजी जर तुम्ही घेतली तर तुमच्या शरीरावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही एनर्जी ड्रिंक घेणे टाळावे, असंही डॉक्टर गणेश सपकाळ यांनी सांगितले आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 09, 2024 1:47 PM IST