Eknath Shinde : शिंदेंकडून एकाच दगडात दोन पक्षी, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पडद्यामागची गणितं काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना मोठी संधी मिळाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत मतदान असलं तरी त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली: देशाच्या 17व्या उपराष्ट्रपतीपदासाठीसाठी मतदान आज होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सरळ लढत आहे. संख्याबळाचा विचार करता एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जात आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या मतांमध्ये अंतर असले तरी क्रॉस वोटिंग होईल का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पण, या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना मोठी संधी मिळाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत मतदान असलं तरी त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याने निवडणूक होणार आहे. संसद भवनात सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने क्ऱॉस वोटिंगचा धास्ती दोन्ही आघाड्यांना आहे. या निवडणुकीत विरोधकांची मते फोडून आपल्याकडे अधिक संख्याबळ असल्याचं दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न भाजप-एनडीएकडून करण्यात येणार आहे. तर, सत्ताधारी गटातील काही मते खेचून एनडीएला धक्का देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीचा असणार आहे.
advertisement
महाराष्ट्रातील मते फुटणार?
सत्ताधारी आघाडीत प्रवेशण्यास उत्सुक असलेली खासदार मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने आपली निष्ठा कुठं आहे, हे दाखवणार असल्याची चर्चा आहे. सध्या लोकसभेत महाराष्ट्रातून इंडिया आघाडीकडे लोकसभेतील 30 खासदारांचे बळ आहे. त्यात काँग्रेसचे 13, ठाकरे गटाचे 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत.
एकनाथ शिंदेंचे एकाच दगडात दोन पक्षी
advertisement
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात ठाकरे गटातील काही खासदार असल्याचीही कुजबुज सुरू असते. 'ऑपरेशन लोट्स'च्या माध्यमातून शिंदे हे ठाकरे गटाला झटका देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्यासाठी शिंदे गट काही मोठी हालचाल करण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील राजकीय ताकद असल्याचे शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न आहेत.
advertisement
शिंदे गटाचा हा प्रयत्न कशाला?
उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली. फक्त आमदार, खासदार नव्हे तर थेट पक्षच शिंदे यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर ठाकरे गटाने आमदार अपात्रता आणि पक्ष निवडणूक चिन्हावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अंतिम सुनावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर खासदारांचे समर्थन दाखवण्यासाठी गुप्त मतदानात आपले संख्याबळ वाढवून दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : शिंदेंकडून एकाच दगडात दोन पक्षी, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पडद्यामागची गणितं काय?