Health Tips : हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे

Last Updated:

कोमट तीळाचे तेल अंघोळीच्या आधी अंगाला लावणे हा उपाय आयुर्वेदात खूप लाभदायक मानला जातो. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.

+
Skin

Skin Care Tips 

अमरावती : हिवाळ्यात पूर्ण शरीराची त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळं अनेक त्रास सहन करावे लागतात. यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. पण, त्याचाही काही फायदा होत नाही. पण, कोमट तिळाचे तेल अंघोळीच्या आधी अंगाला लावणे हा उपाय आयुर्वेदात खूप लाभदायक मानला जातो. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. याबद्दलचं माहिती डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
तिळाचे कोमट तेल अंगाला लावल्यास होणारे फायदे पुढीलप्रमाणे
1. तिळाचे तेल कोमट करून अंगाला लावल्यास त्वचा मऊ, मुलायम व पोषक होते. तिळाच्या तेलात फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात. कोमट तेल त्वचेच्या आतपर्यंत शोषले जाते आणि ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. नियमित लावल्यास त्वचा अधिक ग्लोइंग दिसते.
2. कोरड्या हवेत होणारी ऍलर्जी, खाज, कडकडीत त्वचा यावर तिळाचे तेल हे उत्तम पर्याय आहे. खासकरून पायाच्या टाचा फाटण्यापासून वाचवते.
advertisement
3. तीळ तेल उष्ण गुणधर्माचे आहे. यामुळे शरीराला ऊब मिळते आणि थंडीत होणारे दुखणे कमी होते. तसेच स्ट्रेस कमी आणि झोप सुधारते. तीळ तेलातील घटक नर्व्हस सिस्टिम शांत करतात. मालिश केल्याने मन निवांत होते आणि झोप चांगली येते.
advertisement
4. त्याचबरोबर त्वचेवरील टॉक्सिन्स काढण्यात मदत करते. कोमट तेल त्वचेतील डेड सेल्स सैल करतात. त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ केल्यास हे टॉक्सिन्स स्वच्छ निघून जातात.
5. तिळाचे तेल स्किन टोन सुधारते आणि टॅनिंग कमी करते. नियमित वापराने त्वचा उजळ वाटते, कारण तेलात ऍंटिऑक्सिडंट्स जास्त असतात.
कसे लावावे?
2 ते 3 चमचे तिळाचे तेल हलके कोमट करा. हात, पाय, पाठ, मान, पोट संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने लावा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने अंघोळ करा. उष्ण पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा. तसेच उन्हाळ्यात हे तेल लावू नये.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement