advertisement

Health Tips : तुम्हाला सारखा राग येतो, रात्री झोप लागत नाही? सावधा व्हा, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

आजच्या धावपळीच्या युगात झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण अनिद्रेला सामोरे जात असून याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे.

+
News18

News18

बीड : आजच्या धावपळीच्या युगात झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण अनिद्रेला सामोरे जात असून याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपेचा अभाव हा केवळ थकवा नाही तर भविष्यात गंभीर आजारांना आमंत्रण देणारा घटक ठरू शकतो. याबाबत बीड जिल्ह्यातील आरोग्य तज्ज्ञ विलास राठोड यांनी झोप न येण्यामागील प्रमुख कारणांवर सविस्तर माहिती दिली.
तज्ज्ञांनी सांगितले की, झोप न येण्यामागील पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक ताणतणाव आणि चिंता. कामाचा वाढता ताण, आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्यासंबंधी भीती यामुळे मन अस्वस्थ राहते. रात्री झोपण्याच्या वेळी मेंदू सतत विचार करत राहिल्याने झोप लागत नाही. दीर्घकाळ असा ताण राहिल्यास नैराश्य, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो.
advertisement
दुसरे कारण म्हणजे चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा अतिवापर हा आजचा सर्वात मोठा धोका ठरत आहे. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो, जे झोपेसाठी अत्यावश्यक आहे. तसेच उशिरा चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने शरीर सतर्क राहते आणि झोप उडते.
advertisement
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आहारातील चुका आणि आरोग्य समस्या. उशिरा किंवा जड, तेलकट जेवण केल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. ॲसिडिटी, पोटदुखी, श्वसनाचे आजार, सांधेदुखी किंवा दीर्घकालीन वेदना यामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो. काही औषधांचे दुष्परिणाम देखील झोपेवर परिणाम करतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना वेळेवर झोपण्याची सवय लावणे, झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळणे, हलका आणि संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली असून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते असा इशारा यावेळी देण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : तुम्हाला सारखा राग येतो, रात्री झोप लागत नाही? सावधा व्हा, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement