advertisement

Health Tips : कफ सिरप ठरतंय लहान मुलांसाठी धोकादायक, पालकांनी काय काळजी घ्यावी? डॉक्टरांनी स्पष्टचं सांगितलं, Video

Last Updated:

मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे काही लहान बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणताही आजार लहान किंवा मोठा नसतो, त्याची योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात.

+
लहान

लहान मुलांना कफ सिरप देताना "ही"काळजी घ्या..

पुणे: मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे काही लहान बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणताही आजार लहान किंवा मोठा नसतो, त्याची योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामुळेच कोल्ड्रीफसारखे कफ सिरप खरंच लहान मुलांसाठी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा सिरपमध्ये असलेले काही रासायनिक घटक बाळांच्या शरीरावर दुष्परिणाम करू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देणे टाळावे, असा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
कोल्ड्रिफ कफ सिरप दिल्यामुळे मध्यप्रदेशात 18 आणि नागपूर जिल्ह्यात 8 लहान बालकांचा मृत्यू झाला. या कफ सिरपमध्ये असलेल्या धोकादायक रसायनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आले. 1950 मध्ये या कफ सिरप कोडेनला पर्याय म्हणून वापरण्यात येत होते. मुख्यतः कोरडा खोकला येत असेल तर ह्या औषधाचा वापर करण्यात येतो. जर लहान मुलांना किंवा रुग्णाला लिव्हर संबंधित किंवा किडनी संबंधित आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
पालकांनी काय काळजी घ्यावी?
साधा सर्दी खोकला असेल तर कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णाला देऊ नये. वेगवेगळी औषधे लहान मुलांना किती प्रमाणात द्यावी हे तपासून पाहावे. लहान मुलांच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे डोस द्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलवरून घेतलेली औषधे लहान मुलांना देऊ नयेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : कफ सिरप ठरतंय लहान मुलांसाठी धोकादायक, पालकांनी काय काळजी घ्यावी? डॉक्टरांनी स्पष्टचं सांगितलं, Video
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement