Skin Care Routine : हिवाळ्यामध्ये डेली स्किन केअर रूटीन कसा असायला हवा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हिवाळा सुरू होताच आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात त्वचेला लवकर हानी पोहचते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या त्वचेची दैनंदिन काळजी कशी घ्यावी? याबाबत त्वचारोग तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळ्यामध्ये अनेकांची त्वचा कोरडी पडते आणि त्याची योग्य काळजी न घेतल्यास पिंपल्स येणे, त्वचेला खाज सुटणे यासारखे प्रकार वाढतात. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हिवाळ्यात आपल्या त्वचेची दैनंदिन काळजी कशी घ्यावी? म्हणजेच आपले डेली रूटीन काय असले पाहिजे? याबाबतचं त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिवाळ्यात आपल्या त्वचेची दैनंदिन काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली की, सर्वात आधी घरगुती उपाय केले जातात. ते सर्वात आधी बंद करायला पाहिजे, कारण आपल्या त्वचेला कशापासून अलर्जी आहे? हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे नेहमी आपल्या त्वचेला सूट होईल असेच प्रॉडक्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायला पाहिजे, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
advertisement
तेलकट त्वचा असणाऱ्या अनेकांमध्ये गैरसमज असतो की, माझी त्वचा आधीच तेलकट आहे, मी कशाला मॉइश्चरायझर वापरायचे? पण तसं नसते, हिवाळ्यात तेलकट त्वचा सुद्धा कोरडी होते. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर लगेच त्वचेला मॉश्चरायझर लावणे गरजेचे आहे. तेलकट त्वचा असल्यास ऑईल फ्री, ग्लिसरीन फ्री असे मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे तुमची त्वचा सतेज राहील, तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही.
advertisement
हिवाळ्यात सर्वात त्रासदायक त्वचा म्हणजे कोरडी त्वचा. हिवाळ्यात या प्रकारची त्वचा असणारे लोकं अतिशय वेदना सहन करतात. कारण त्यांची वाचा फाटते, त्यावर रॅश येतात. त्यासाठी माईल्ड क्लिनजिंग लोशन असतात, ते सुद्धा ग्लिसरीन फ्री असलेले हे कोरड्या त्वचेसाठी अतिशय योग्य असतात. त्याचबरोबर हायलॅरॉनिक ऍसिड आणि नियासियामाईंड हे कॉम्बिनेशन असलेले मॉइश्चरायजर सुद्धा कोरड्या त्वचेसाठी डेली रूटीनमध्ये वापरायला पाहिजे. नॉर्मल स्किन असलेल्यांना दोन्ही प्रकारचे म्हणजे तेलकट त्वचेसाठी असलेले प्रॉडक्ट आणि कोरड्या त्वचेसाठी असलेले प्रॉडक्ट दोन्ही चालतात, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
advertisement
हिवाळ्यात डेली रूटीनमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
1. हिवाळ्यात ब्लिच आणि स्क्रब टाळावे. त्यामुळे त्वचेवरची लेअर निघते आणि त्वचा काळी पडते.
2. घरगुती उपाय करून चेहऱ्याला घासू नये. त्यामुळे त्वचेला हानी पोहचते.
3. चंदन, मुलतानी माती, बेसन पिठ यासारखे घरगुती प्रॉडक्ट वापरू नये. तुमच्या स्किनला सूट होते की नाही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असंही डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
advertisement
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
December 10, 2024 4:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Routine : हिवाळ्यामध्ये डेली स्किन केअर रूटीन कसा असायला हवा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

