उन्हाळ्यात लोकांचा घसा का होतो खराब? डाॅक्टरांनी सांगितलं नेमकं कारण आणि सोपा उपाय!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात फ्लू, राइनोव्हायरस आणि मेटाप्न्युमोव्हायरस यांसारख्या संसर्गजन्य व्हायरसमुळे घसा दुखण्याच्या समस्या वाढतात. डॉक्टरांच्या मते, यासाठी कोणतेही विशेष औषध आवश्यक नसते. पुरेशी...
उन्हाळ्यात घसा दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. या दिवसात अनेक लोकांना सर्दी, खोकला आणि तापही येत आहे. घसा दुखण्याचे कारण म्हणजे बदलणारे हवामान. या मोसमात विषाणूजन्य (व्हायरल) संसर्ग जास्त प्रमाणात होतो. या वेळीही लोकांच्या घसा दुखण्याचे मुख्य कारण हेच मोसमी विषाणू आहेत. सध्या वातावरणात इन्फ्लूएंझा बी, रायनोव्हायरस आणि मेटा न्युमोव्हायरस हे सर्वात धोकादायक विषाणू फिरत आहेत. यांच्यामुळे लोकांचा घसा दुखत आहे.
केमिस्टच्या सल्ल्याने अँटी-बायोटिक औषध घेऊ नका
20 वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन सांगतात की अशा समस्येमध्ये तुम्हाला कोणत्याही विशिष्ट उपचारांची गरज नाही. तुम्ही फक्त अँटी-एलर्जिक तापाचे औषध घेऊ शकता. याशिवाय पुरेसे पाणी प्या आणि वाफही घ्या. जर तुम्ही हे सर्व केले, तर तुम्हाला 5 ते 7 दिवसात आराम मिळेल. डॉ. नीतू यांच्या मते, जर तुम्हाला शरीरात ठीक वाटत नसेल आणि घसा बरा झाल्यावरही तुम्हाला खोकला येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. केमिस्टच्या सल्ल्याने अँटी-बायोटिक औषध घेऊ नका, कारण अनेकवेळा अशा विषाणूजन्य संसर्गांवर अँटी-बायोटिक औषधांचा परिणाम होत नाही.
advertisement
रोगप्रतिकारकशक्ती वाढवा अन् तंदुरुस्त रहा
डॉ. नीतू जैन सांगतात की, या मोसमात विषाणूजन्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारा. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि नट्स आणि ड्रायफ्रुट्ससारखे प्रथिनयुक्त पदार्थ खा. अशा विषाणूजन्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी तुम्ही फ्लूची लस देखील घेऊ शकता, जी दरवर्षी मे महिन्यात दिली जाते.
हे ही वाचा : फक्त 'हे' एकच इंजेक्शन घ्या अन् 6 महिने हार्ट अटॅकपासून स्वतःचा बचाव करा; शास्त्रज्ञांनी बनवलं नवं औषध!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 02, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात लोकांचा घसा का होतो खराब? डाॅक्टरांनी सांगितलं नेमकं कारण आणि सोपा उपाय!