Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाज सुटतेय? डॉक्टरांनी सांगितले उपाय

Last Updated:

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्वचेची काळजी घेतल्यास फायदा होईल.

+
Winter

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाज सुटतेय? डॉक्टरांनी सांगितले उपाय

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती: हिवाळा सुरू झाला आणि थंडीचा कडाका वाढला की तेलकट त्वचा सुद्धा कोरडी पडते. कोरडी त्वचा तर आणखीनच कोरडी पडून अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी असणाऱ्या व्यक्तीला अनेक वेळा वायजळ ही समस्या देखील उद्भवते. त्याचबरोबर कोरडी त्वचा लवकर उलते आणि त्या व्यक्तीला अनेक वेदना सहन कराव्या कराव्या लागतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. याबाबतच अमरावती येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिलीये.
advertisement
त्वचेचा प्रकार कोणता?
हिवाळ्यात आपली त्वचा अतिशय रुक्ष होते. त्यामुळे त्यावर वेगवेगळे इन्फेक्शन होण्याची भीती असते. हिवाळा सुरू झाल्यानंतर त्यावर कोणतेही उपचार करण्याआधी आपल्या त्वचेचा प्रकार ओळखणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेचे तीन प्रकार असतात. तेलकट, कोरडी, मिक्स आणि कॉम्बिनेशन. हिवाळ्यात यातील सर्वात त्रासदायक त्वचेचा प्रकार कोरडी त्वचा हा असतो. हिवाळ्यात कोरडी त्वचा आणखी कोरडी होते आणि त्रास व्हायला सुरवात होते. त्यामुळे हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
कोरड्या त्वचेवर उपाय
हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेसाठी माइल्ड क्लिनजिंग लोशन ते सुद्धा ग्लिसरीन फ्री असलेले अतिशय योग्य असतात. हायलँरूनिक ऍसिड आणि नियासीयामाईड असलेले कॉम्बिनेशनचे मॉइश्चरायझर कोरड्या त्वचेसाठी वापरले तर निस्तेज असलेली तुमची त्वचा सतेज होईल आणि त्रास होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मॉइश्चरायझर वापरने टाळावे. चुकीच्या मॉइश्चरायझरमुळे त्वचेला पुरळ येतात आणि त्वचा लाल देखील होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
आहार कसा असावा? 
हिवाळ्यात मिळणारी सर्व फळे खायला पाहिजे. त्यामुळे त्वचेवर खूप इफेक्ट होतो. त्वचा चमकदार आणि सतेज दिसायला मदत होते. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या सुद्धा आपल्या आहारात असायला पाहिजे. आपली त्वचा सतेज होण्यासाठी आहार देखील अत्यंत महत्वाचा आहे, असे डॉ. अनुराधा यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाज सुटतेय? डॉक्टरांनी सांगितले उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement