advertisement

Makhana Kheer Recipe : बोटं चाटायला लावेल अशी मखाना खीर, ही घ्या रेसिपी, घरच्या घरी झटपट बनवा गोडपदार्थ

Last Updated:

लोक तांदूळ, गहू, रवा, शेव या सगळ्यांपासून खीर बनवतात. पण सध्या एक नवीन आणि हेल्दी पर्याय घराघरात लोकप्रिय होत आहे, मखान्याची खीर.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय घरात जेवणानंतर काहीतरी गोड मिळालं नाही तर जेवण अपूर्ण वाटतं. अनेकांना खीर हा त्या गोडातला सगळ्यात आवडता पर्याय वाटतो. कारण ती झटपट आणि घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनते. चव, सुगंध आणि पारंपरिकता, या तिन्हींचं उत्तम मिश्रण म्हणजे खीर. लोक तांदूळ, गहू, रवा, शेव या सगळ्यांपासून खीर बनवतात. पण सध्या एक नवीन आणि हेल्दी पर्याय घराघरात लोकप्रिय होत आहे, मखान्याची खीर.
मखाना म्हणजेच फॉक्स नट्स हे केवळ हलकेच नाहीत तर अनेक आरोग्यदायी गुणांनी भरलेले आहेत. त्यामुळे मखान्याची खीर चवदार तर लागतेच, पण त्याचबरोबर शरीराला अनेक फायदेही देते. मखाना पचनासाठी चांगला, वजन कमी करण्यास मदत करणारा आणि तणाव कमी करणारा आहे. रात्री चांगली झोप येण्यासाठीही मखाना उपयुक्त मानला जातो.
मग चला, आता घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया ही खास आणि पौष्टिक मखान्याची खीर
advertisement
मखान्याची खीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री
मखाना - 2 कप
दूध - 1 लिटर
साखर - चवीनुसार
घी - 2 चमचे
वेलची पावडर - 1/2 चमचा
बदाम, पिस्ता, काजू - बारीक तुकडे
मखान्याची खीर कशी बनवाल?
1. मखाना भाजून घ्या
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडंसं घी गरम करा आणि त्यात मखाना घालून मंद आचेवर कुरकुरीत आणि हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मखाना चांगला भाजल्याने खीरमध्ये त्याचा स्वाद छान येतो.
advertisement
2. दूध उकळून घ्या
आता एका खोलगट भांड्यात एक लिटर दूध घाला आणि उकळी येऊ द्या. दूध उकळताना त्यात भाजलेले मखाने घालून मिक्स करा.
3. ड्रायफ्रूट्स रोस्ट करा
मखाने दूधात मऊ होत असताना दुसऱ्या पॅनमध्ये घी गरम करा आणि त्यात बदाम, काजू, पिस्ता हलकेसे रोस्ट करून घ्या.
4. खीर घट्ट करा
मखाने दूधात हळूहळू एकजीव होतील आणि खीर थोडी घट्ट होऊ लागेल. सतत हलवत राहा जेणेकरून तळाला लागू नये.
advertisement
5. शेवटची चव
खीर योग्य घट्टपणाला आली की त्यात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळा. दोन मिनिटे शिजू द्या आणि गॅस बंद करा. तुमची सुगंधित, स्वादिष्ट आणि पौष्टिक मखान्याची खीर तयार. तुम्ही ही खीर गरम किंवा थंड जशी आवडेल तशी सर्व्ह करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makhana Kheer Recipe : बोटं चाटायला लावेल अशी मखाना खीर, ही घ्या रेसिपी, घरच्या घरी झटपट बनवा गोडपदार्थ
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement