advertisement

Holi Hair Care : होळीआधी आणि नंतर 'या' टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी! नाहीतर केस होतील डॅमेज

Last Updated:

Hair care tips before and after holi : रासायनिक रंग आपल्या त्वचेवर आणि केसांवर लागल्यास त्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही तुमचे केस रंगांच्या प्रभावापासून वाचवू शकता.

धुलिवंदनानंतर अशी घ्या केसांची काळजी..
धुलिवंदनानंतर अशी घ्या केसांची काळजी..
मुंबई : होळी रंगाचा सण. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. होळीच्या म्हणण्यापेक्षा धुलीवंदनाच्या दिवशी सर्वजण खूप रंग खेळतात. ओला, कोरडा सर्व प्रकारचे रंग खेळले जातात. मात्र या रंगांचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. कारण सर्वच जण हर्बल कलर वापरातील असे नाही. काही लोक रासायनिक रंग आणतात.
असे रासायनिक रंग आपल्या त्वचेवर आणि केसांवर लागल्यास त्यांचे अतोनात नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देत आहोत. ज्या फॉलो करून तुम्ही तुमचे केस रंगांच्या प्रभावापासून वाचवू शकता. garimacreates या अकाऊंटवर याबद्दल महिती दिली गेली आहे. त्यांच्यामते, जर तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेतली नाही तर रंगांमुळे तुमचे केस कोरडे, कुरळे, कडक होऊ शकतात आणि टाळूला खाजदेखील येऊ शकते.
advertisement
धुलिवंदनात रंग खेळण्यापूर्वी केस असे करा तयार..
धुलिवंदनाच्या वेळेला केसांवर केवळ कोरडाच नाही तर पाणी आणि ओले रंगही खूप पडतात. म्हणूनच केसांचे नुकसान टाळण्यासाठी रंग खेळायला जाण्यापूर्वी टाळू आणि केसांवर भरपूर तेल लावा. शक्य असल्यास तुम्ही शॉवर कॅप किंवा स्कार्फने तुमचे केस कव्हरदेखील करू शकता. त्याचबरोबर रेंग खेळताना केस मोकळे सोडू नका. त्याची वेणी घाला किंवा जुडा बनवा.
advertisement
धुलिवंदनानंतर अशी घ्या केसांची काळजी..
रंग खेळून आल्यानंतर सर्वात आधी भरपूर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा. रंग आणि त्याचे कण काढून टाकण्यासाठी क्लॅरीफायिंग शॅम्पू वापरा. केसातील ओलावा संतुलनासाठी डीप कंडिशनिंग करा. नंतर केस धुताना सौम्य DIY टाळू एक्सफोलिएशनचा वापर करा. यासाठी साखर, नारळ तेल, मध आणि रोझमेरी तेल घ्या. हे सर्व एकत्र करून केसांवर आणि टाळूवर लावा. यानंतर केस धुवा आणि शेवटी केसनावर सीरम लावा.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Garima Sharma ✨ (@garimacreates)



advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi Hair Care : होळीआधी आणि नंतर 'या' टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी! नाहीतर केस होतील डॅमेज
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement