Heels Buying Tips : तुम्हाला माहितीये, हिल्स खरेदी करण्यापूर्वी करायला हवी टेस्ट! असे कळेल तुमच्यासाठी योग्य कोणती
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to buy perfect heels for you : ज्या मुली अगदी पहिल्यांदाच हिल्स घेणार आहेत, ज्यांना हिल्सची खूप भीती वाटते. पण तुम्हाला माहितीये जर तुम्ही हिल्स विकत घेण्यापूर्वी ती योग्य प्रकारे टेस्ट केलीत, तर तुम्हाला त्यामुळे अजिबात त्रास होणार नाही.
मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणींना हिल्स वापरण्याची सवय असते किंवा वापरण्याची इच्छा तरी नक्कीच असते. ज्यांना सवय असते त्यांना हिल्समुळे त्रास होत नाही. पण ज्या मुलींना हिल्स वापरण्याची सवय नाही किंवा त्या अगदी पहिल्यांदाच हिल्स घेणार आहेत, ज्यांना हिल्सची खूप भीती वाटते. पण तुम्हाला माहितीये जर तुम्ही हिल्स विकत घेण्यापूर्वी ती योग्य प्रकारे टेस्ट केलीत, तर तुम्हाला त्यामुळे अजिबात त्रास होणार नाही.
होय, आज तुम्हाला अशा काही टिप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य हिल्स निवडणं सोपं जाईल आणि योग्य हिल्स घातल्यामुळे तुमच्या टाचांना किंवा पायांना अजिबात त्रास होणार नाही. अलिकडेच, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तुमच्यासाठी योग्य हिल्स कशी निवडायची, हिल्सची योग्यप्रकारे तपासणी कशी करायची हे सांगितले आहे.
हिल्स मजबूत आहेत की नाही हे ओळखणे आवश्यक..
काही हिल्स तुम्हाला कितीही आवडल्या, आकर्षक अदिसत असल्या तरी त्या मजबूत आहेत की नाही हे तपासणे आवश्यक असते. हिल्स कमकुवत असल्या तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसे की, हिल्सवर तुमचे संतुलन बिघडू शकते, घोट्याला इजा होऊ शकते किंवा मुराद येऊ शकते, गुडघे आणि पाठीवर दबाव वाढू शकतो, पडण्याचा धोका वाढतो. म्हणूनच डिझाइन, ब्रँड किंवा रंगानुसार हिल्स खरेदी करण्यापेक्षा त्या मजबूत आहेत कि नाही हे तपासणं गरजेचं आहे.
advertisement
हिल्स खरेदी करण्यापूर्वी करा या महत्त्वाच्या टेस्ट..
- हिल्सचा मागचा उंच भाग हळूवारपणे हलवून पाहा. जर ते सहज हलत असेल, तर त्या हिल्स कमकुवत आहेत आणि त्या चालताना तुमच्या पायांमध्ये समस्या निर्माण करू शकतात.
- तुम्हाला जी हिल्स घ्यायची आहे, ती घालून उभे राहा. त्यावर तुमचे वजन डाव्या आणि उजव्या बाजूला हलके झुकवून पाहा. जर तुम्हाला त्यावर उभे राहून अस्थित वाटत असेल तर त्या हिल्स तुमच्यासाठी असुरक्षित आहेत.
advertisement
- हिल्स घालून दुकानात काही पावलं चालून पाहा. जर चालताना तुमचा पाय मुरगळत असेल किंवा तोल जात असेल, तर अशी हिल्स घेऊ नका. कारण अशा हिल्स पुढे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतात.
advertisement
योग्य हिल्स खरेदी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
तुम्ही घेऊ इच्छिणारी हिल्स जर चालताना हलकीशी वाकडी तिकडी होत असेल तर घेऊ नका, हिल्सवर चालताना ती अस्थिर वाटत असेल, तर ती खरेदी करणं टाळा. ज्या हिल्सने पायाला योग्य आधार मिळत नसेल ती तुमच्यासाठी सुरक्षित नाही.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heels Buying Tips : तुम्हाला माहितीये, हिल्स खरेदी करण्यापूर्वी करायला हवी टेस्ट! असे कळेल तुमच्यासाठी योग्य कोणती








