Valentine's Day : सिंगल आहात? मग काय झालं, सेलिब्रेशन करूच शकता! डॉक्टर काय सांगतात वाचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकालच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो, आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच जातं. मग दररोज नाही तर निदान आज प्रेमाच्या दिवशी तरी स्वतःसाठी वेळ काढावा.
रोहित भट्ट, प्रतिनिधी
अल्मोडा : आजकाल शालेय विद्यार्थीसुद्धा रिलेशनशिपमध्ये असतात. अभ्यास करता-करता त्यांच्या मनात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होतं आणि ते एकमेकांचे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड होतात. त्यामुळे वयाच्या पंचविशीत किंवा तिशीत असतानाही एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार भेटला नसेल तर, अशा विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करताना पाहून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी स्वतःसाठी वाईट वाटतं. परंतु असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. सिंगल असलात तरी आपण अतिशय धुमधडाक्यात हा प्रेमाचा दिवस साजरा करू शकता, कसं? पाहूया.
advertisement
सर्वात आधी मनातून गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडवाल्या रिलेशनशिपचं ओझं काढून टाका. व्हॅलेंटाईन्स डेला स्वतःला काय आवडतंय त्यावर भर द्या. स्वतःची फार काळापासून एखादी इच्छा अपूर्ण असेल तर ती आजच्या दिवशी पूर्ण करा, निदान त्यासाठी प्रयत्न करा. कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत छान वेळ घालवा. स्वयंपाक करायला आवडत असेल, तर एक स्वादिष्ट पदार्थ बनवून सर्वांना खाऊ घाला. तुमचा जो काही छंद असेल तो या दिवशी विशेष जोपासा. एकूणच स्वतःला वेळ देऊन तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे आनंदात घालवू शकता.
advertisement
व्हॅलेंटाईन्स डे असा करा सेलिब्रेट
मनसोपचारतज्ज्ञ प्रीती टम्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असायलाच हवा असं काही नाहीये. तुम्ही प्रेम वर्षाचे बारा महिने सेलिब्रेट करू शकता. आजच्या दिवशी आई-वडिलांसोबत, भाऊ-बहिणीसोबत वेळ घालवा. तुम्ही त्यांना व्हॅलेंटाईन्स गिफ्ट देऊ शकता. तसंच, मित्र-मैत्रिणींना किंवा लहान मुलांनासुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता. त्याचबरोबर आपण एखाद्या आश्रमात जाऊन व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलात तर उत्तमच. त्यामुळे ज्यांचं या जगात कोणीच नाही, त्यांना प्रेम दिल्याचं मोठं समाधान आपल्याला मिळेल.
advertisement
स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक!
डॉक्टरांनी सांगितलं की, आजकालच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो, आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच जातं. मग दररोज नाही तर निदान आज प्रेमाच्या दिवशी तरी स्वतःसाठी वेळ काढावा. स्वतःविषयी शक्य तितका सकारात्मक विचार करावा. स्वतःबाबत जेवढे नकारात्मक विचार असतील ते एका कागदावर लिहून काढा आणि त्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून हळूहळू आपसूकपणे तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view commentsLocation :
Almora,Uttarakhand
First Published :
February 14, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Valentine's Day : सिंगल आहात? मग काय झालं, सेलिब्रेशन करूच शकता! डॉक्टर काय सांगतात वाचा


