Boyfriend नवरा तेव्हाच होतो, जेव्हा त्याच्यात असतात 'हे' 3 गुण, मुली लगेच होतात इम्प्रेस!

Last Updated:

मुली मुलांचा फक्त पैसा बघतात किंवा त्यांची लाइफस्टाइल किती उच्च आहे हेच बघतात असं नाही. तर याव्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मुलींना जास्त महत्त्वाच्या वाटतात.

अनेक मुलींना अजिबात फरक पडत नाही की, मुलाने ब्रॅंडेड बूट घातले आहेत की नाही.
अनेक मुलींना अजिबात फरक पडत नाही की, मुलाने ब्रॅंडेड बूट घातले आहेत की नाही.
शक्ती सिंह, प्रतिनिधी
कोटा : फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हटलं जातं. कारण याच महिन्यात 'Valentine's Day' म्हणजेच 'प्रेमाचा दिवस' असतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो, 14 फेब्रुवारीला तर अनेकजण आपल्या मनातलं प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. तुम्हीसुद्धा या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालणार असाल तर आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला नकार मिळू शकतो. मुलींना मुलांमध्ये नेमकं काय आवडतं जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
advertisement
पहिल्या भेटीत मुली प्रेमात पडतात का?
मुली कधीच पहिल्या भेटीत प्रेमात पडत नाहीत. त्या यावेळी मुलाला व्यवस्थित ओळखण्याचा प्रयत्न करतात. मुली मुलांचा फक्त पैसा बघतात किंवा त्यांची लाइफस्टाइल किती उच्च आहे हेच बघतात असं नाही. तर याव्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मुलींना जास्त महत्त्वाच्या वाटतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाचा 'आत्मविश्वास'. अनेक मुलींना अजिबात फरक पडत नाही की, मुलाने ब्रॅंडेड बूट घातले आहेत की नाही. मात्र त्याच्यात अति नाही पण थोडाफार आत्मविश्वास असणं गरजेचं असतं. जर तुमच्या वागण्या-बोलण्यात जराही आत्मविश्वास नसेल तर मुलीकडून तुम्हाला नकार मिळू शकतो.
advertisement
मुलींसाठी मुलांचं मन फार मोठं असणंही आवश्यक असतं. आजकाल मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतात. असं नाही की त्यांना संसार करायला आवडत नाही, परंतु त्यासोबतच त्यांचं करियरसुद्धा महत्त्वाचं असतं. हीच बाब त्यांच्या आयुष्याचा जोडीदार होऊ पाहणाऱ्या मुलाने लक्षात घ्यायला हवी आणि आवश्यक त्यादृष्टीने त्यांना सपोर्ट करायला हवा. शिवाय आपल्याला जश्या मैत्रिणी असू शकतात तसेच आपल्या भावी पत्नीला मित्रही असू शकतात हेसुद्धा प्रत्येक मुलाने समजून घ्यायला हवं. आपली होणारी पत्नी ही एक व्यक्ती आहे तिला मन आहे, तिला फिरायला जावंसं वाटू शकतं. आवडीचे पदार्थ खावेसे वाटू शकतात, हेदेखील त्याने मोठ्या मनाने समजून घ्यायला हवं.
advertisement
आपल्या होणाऱ्या पत्नीला जसं मन आहे तशीच तिला मतंही आहेत. ती आपल्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहे त्यामुळे अर्थातच तिची मतं आपल्यापेक्षा वेगळी असणार, हे लक्षात घेऊन ती स्विकारायची की नाही हा मुद्दा पुढचा आहे, परंतु तिला प्रत्येक मुद्द्यावर तिचं मत मांडता यावं इतकं पोषक वातावरण त्याने निर्माण करायला हवं. तसंच तिच्या मतांचा आदर करायला हवा. तिचं बोलणं बरोबर असेल तर ते स्विकारावं, चूक असेल तर तिला ते शांतपणे सांगावं. हे तीन गुण तुमच्यात असतील तर तुमची प्रेयसी तुम्हाला केवळ लग्नासाठी होकार देणार नाही, तर तुमचा संसारही सुखाचा होईल.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा  
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Boyfriend नवरा तेव्हाच होतो, जेव्हा त्याच्यात असतात 'हे' 3 गुण, मुली लगेच होतात इम्प्रेस!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement