Cooking Tips : हिवाळ्यात दही लागत नाही? वापरा 'या' सोप्या टिप्स, काही मिनिटांत तयार होईल विकतसारखं घट्ट दही

Last Updated:

हिवाळ्याच्या दिवसात देखील बाजारासारखं परफेक्ट दही घरी कसं तयार करायचं याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.

दही
दही
दहीचे सेवन हे आरोग्यासाठी चांगले असल्याने अनेकजण त्याचा दररोज आहारात समावेश करतात. दररोज बाहेरून विकतच दही खरेदी करायला लागू नये म्हणून अनेकजण घरीच दुधापासून दही तयार करतात. परंतु हिवाळ्यात दही लवकर लागत नाही त्यामुळे त्याची चव देखील बिघडते आणि आहारात दररोज दही खाण्याची सवय असलेल्या लोकांचा हिरमोड होतो. अशावेळी हिवाळ्याच्या दिवसात देखील बाजारासारखं परफेक्ट दही घरी कसं तयार करायचं याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
गरम दुधाचा वापर करावा:
दही करणं हा एक प्रकारे फर्मेंटेशन प्रोसेसचा भाग असतो. ज्यामुळे हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात दही लवकर तयार होत. हिवाळ्यात तापमान थंड असल्याने दही पातळ आणि खराब बनते. तेव्हा हिवाळ्यात गरम दुधात दही लावणं चांगलं ठरू शकत. घरी दही बनण्यासाठी कैसरोल कंटेनरचा वापर करावा, यामुळे दुधाचे तापमान काहीकाळ गरम राहते आणि बाहेरील थंड तापमानाचा त्याच्यावर फार परिणाम होत नाही. त्यामुळे उत्तम घट्ट दही तयार होते.
advertisement
विरजण जास्त घालावे :
उन्हाळ्यात दुधात जरासे विरजण टाकले तरी त्याचे दही अगदी सहज बनते. परंतु हिवाळ्यात दही बनवताना दुधात जास्त विरजण टाकावे. तसेच दुधात विरजण टाकून चांगले हलवून झाले की ते भांड अंधाऱ्या किंवा बंद ठिकाणी ठेवावे. दहीचे भांड तुम्ही माइक्रोवेवमध्ये सुद्धा ठेऊ शकता यामुळे दही घट्ट बनते.
advertisement
गरम पाणी वापरा :
हिवाळ्यात दही लावण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता. तापमान थंड असल्याने दही पातळ बनते आणि पाण्यासारखी दिसू लागते. तेव्हा तुम्ही दहीचे भांड गरम पाण्यात देखील ठेऊ शकता. ज्यामुळे दहीचे भांड उबदार राहील आणि दही चांगलं घट्ट होईल.
गरम कापडं गुंडाळा :
जर गरम दूध आणि गरम कंटेनरमध्ये ठेवूनही दही चांगली लागत नसेल आणि घट्ट होत नसेल तर तुम्ही ज्या भांड्यात दही लावलंय त्या भांड्याला चारही बाजूंनी गरम कपडा लपेटा. ज्यामुळे दही अगदी सहज तयार होईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cooking Tips : हिवाळ्यात दही लागत नाही? वापरा 'या' सोप्या टिप्स, काही मिनिटांत तयार होईल विकतसारखं घट्ट दही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement