Business Ideas : फक्त 20 हजार रुपयांमध्ये सुरू करा चप्पलचा व्यवसाय; होईल नफाच नफा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
Business Ideas In Marathi :आपल्याला रोजच्या वापरण्यात हमखास लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा शूज. कमी भांडवलामध्ये चप्पलचा व्यवसाय कसा सुरु करायचा? पाहा
लतिका तेजाळे
मुंबई : आपल्याला रोजच्या वापरण्यात हमखास लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा शूज. आपण चप्पल खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या दुकानात मोठी गर्दी दिसते. त्यामुळे अनेक जणांच्या मनात हा विचार तर नक्कीच आला असेल की चप्पलेच्या दुकानात भरपूर कमाई असेल. या दुकानदारासारखा आपला सुद्धा फुटवेअरचा व्यवसाय (Footwear Business ) असावा पण योग्य बिझनेस आईडिया (Business Idea In Marathi) नसते. त्यामुळे कमीत कमी किती भांडवल लागेल? किती नफा होईल? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. त्यामुळे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय कसा सुरु करायचा? किती नफा होईल? याची माहिती मुंबईतील चप्पल विक्रते सौरभ होनकांबळे यांनी दिली आहे.
advertisement
स्वतःचा चप्पल व्यवसाय कसा करावा?
कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा कॉलनी सौरभ होनकांबळे यांचे एजे फुटवेअर नामक दुकान हे चप्पलाचे होलसेल दुकान आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या चप्पला होलसेल दरात खरेदी करता येईल. सौरभ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सर्वप्रथम व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवावी. सुरुवातीला घरून व्यवसाय करता येईल. परंतु दुकान असणे अतिउत्तम. फुटवेअरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 20 ते 30 हजार रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे.
advertisement
लग्नाच्या बस्त्यासाठी कमी बजेटमध्ये साडी खरेदी करायचीय? फक्त 260 रुपयांपासून पाहा साड्या Video
कुठल्याही होलसेल दुकानातून लॉटमध्ये चप्पल खरेदी केल्यास अगदी 30 रुपये एक जोड चप्पलचा अशा किंमतीत चप्पला खरेदी करता येतील. 20 ते 30 हजारांच्या किंमतीत 300 ते 500 चप्पल पीस आपण खरेदी करू शकतो. या व्यवसायात आपण प्रॉफिट मार्जिन ही 30 ते 40 टक्के अशी ठेवू शकतो. 100 रुपयात खरेदी केलीली चप्पल 130 ते 140 रुपये किंमतीत विकून नफा कमवू शकतो. महिन्यात आपण 30 हजार रुपयांच्या मालवर 10 ते 18 हजार रुपये नफा कमवू शकतो.
advertisement
पारंपरिक आणि फॅशनचे अनोखे कॉम्बिनेशन; शिवण कौशल्यातून साकारली ब्लाऊजवर भारताच्या विविध भागांची संस्कृती
त्याचप्रमाणे महत्त्वाची टीप म्हणजे चप्पल विकताना आपले मार्केटिंग स्किल उत्तम असणे गरजेचे आहे. ग्राहक जर बार्गेन करणारा असेल, तर त्या अनुषंगाने थोडी जास्तीची किंमत सांगून ती कमी कमी करत किंमत आपल्या ठराविक किंमतीवर आणून तो सौदा पक्का करावा म्हणजे कुठलाही तोटा अनुभवा लागणार नाही, अशी माहिती सौरभ होनकांबळे यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2024 9:21 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Business Ideas : फक्त 20 हजार रुपयांमध्ये सुरू करा चप्पलचा व्यवसाय; होईल नफाच नफा