काय सांगता! नवरा-बायको आहात पण तुमचं भांडणच होत नाही, मग तुमचं नातं डेंजर झोनमध्ये आहे

Last Updated:

Relationship Pink Flag : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भांडत नसाल तर समजून घ्या की तुमचं नातं धोक्यात आहे, हा नातं तुटण्याआधीचा पिंक फ्लॅग आहे.

News18
News18
नवी दिल्ली : नवरा-बायको म्हटलं की भांडणं आलीच. पण काही कपल एकमेकांवर इतके प्रेम करतात की भांडणच करत नाहीत. ओ... किती क्युट कपल आहे, एकमेकांवर किती प्रेम करतं, असं त्यांच्याबाबत आपल्याला कौतुकही वाटतं. तुमचं नातंही असंच आहे का? तुम्हा नवरा-बायकोत भांडणंच होत नाहीत का? तर सावध व्हा. कारण तुमचं नातं डेंजर झोनमध्ये आहे.
आजवर तुम्ही वाद, भांडणं यामुळे नातं तुटल्याची प्रकरणं पाहिली असतील. पण भांडण न करणं हेसुद्धा नातं तुटण्याचं कारण ठरू शकतं. अनेक जोडप्यांना भांडणं होत नाहीत याचा अभिमान वाटतो जे नात्यासाठी चांगलं नाही.तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण नात्यातील हा रेड नाही पण पिंक फ्लॅग आहे. नात्यात पिंक फ्लॅग हा एक  धोक्याचा इशारा आहे. यात नातं तुटत नाही, परंतु जोडप्यांसाठी ते निश्चितच खूप कठीण असू शकतं. पिंक फ्लॅगमध्यें कपल एकत्र असतात पण तरीही त्यांना अंतर जाणवतं.
advertisement
काय आहे पिंक फ्लॅग?
रिलेशनशिप एक्स्पर्ट आशिता भारद्वाज म्हणतात की पिंक फ्लॅग हा नातेसंबंधात उद्भवणाऱ्या समस्यांचं लक्षण आहे. जर जोडप्याने हे वेळीच समजून घेतलं तर त्यांचं नातं तुटण्यापासून वाचवता येईल. प्रत्येक जोडपं एकमेकांपासून वेगळं असतं. जर दोन्ही जोडीदारांचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. एक जोडीदार शारीरिक स्पर्शाला प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग मानतो, तर दुसऱ्या जोडीदारासाठी प्रेम व्यक्त करणं म्हणजे एकत्र बाहेर जाणं, चित्रपट पाहणं किंवा घरातील कामात मदत करणं. या विचारसरणीने जोडप्याच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत. तर त्यामुळे त्यांच्यात भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं.
advertisement
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जोडीदाराशी भांडण न करणं शहाणपणाचे आहे, तर तुम्ही चुकीचे आहात . भांडण हे निरोगी नात्याचं लक्षण आहे. कारण भांडणं दोन्ही जोडीदारांचे विचार बाहेर काढतात, दोघंही एकमेकांशी आपले विचार शेअर करतात. जे कपल भांडत नाहीत ते त्यांच्या भावना दाबून ठेवतात आणि जेव्हा समस्या सोडवल्या जात नाहीत तेव्हा मतभेद निर्माण होऊ लागतात जे कधीही नात्यात तणाव निर्माण करू शकतात आणि नातं संपुष्टात येऊ शकतं.
advertisement
प्रत्येक नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. जर तुमच्या जोडीदाराशी संवाद नसेल तर हा पिंक कलरचा इशारा आहे, कारण त्यामुळे गैरसमज होतात. त्याच वेळी, जर जोडीदाराच्या महत्त्वाकांक्षा एकमेकांशी भिडल्या तर ते गुलाबी पिंकचं लक्षण आहे. जसं नवरा वडील होण्याऐवजी त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करू इच्छितो पण पत्नीला मुलं हवी असतात. यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण होतो जो दुरावा निर्माण करू शकतो.
advertisement
पिंक फ्लॅग ग्रीन फ्लॅगमध्ये कसा बदलायचा?
जर तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं चांगलं नसेल, तर पिंक फ्लॅगऐवजी ग्रीन फ्लॅगमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलता तेव्हाच हे शक्य आहे. जर जोडप्यांमध्ये मोकळा संवाद असेल तर ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील, यामुळे कोणताही मतभेद टाळता येईल आणि दोघंही एकमेकांच्या मतांचा आदर करू लागतील. याशिवाय, तुमच्या जोडीदाराला स्पेस देणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचं किंवा तिचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य देखील आहे. प्रत्येक जोडप्याने स्वतःच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत जेणेकरून ते एकमेकांवर ओझं बनू नयेत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
काय सांगता! नवरा-बायको आहात पण तुमचं भांडणच होत नाही, मग तुमचं नातं डेंजर झोनमध्ये आहे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement