Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा

Last Updated:

Healthy Foods for Eyes: वाढतं प्रदूषण आणि स्क्रिन टाईममुळे डोळ्यांच्या आजारात आणि दृष्टीदोषात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे तुम्हाला दृष्टीदोष दूर करून डोळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा लागेल.

प्रतिकात्मक फोटो : डोळ्यांची काळजी घ्यायची आहे  मग खा ‘हे’ पदार्थ
प्रतिकात्मक फोटो : डोळ्यांची काळजी घ्यायची आहे मग खा ‘हे’ पदार्थ
मुंबई: डोळे ही देवाने माणसाला दिलेली सर्वांगसुंदर देणगी आहे. जर माणसाला डोळे नसतील तर त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने अंधारात जातं. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. काही वर्षापूर्वी वयोवृद्ध व्यक्तींना चष्मा लागायचा. नंतर मध्यवर्गीय व्यक्तींना चष्मा लागू लागला.त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला की, त्या व्यक्तीला चाळीशी लागली असं म्हटलं जायचं. मात्र आता टिव्ही, कंम्प्युटरच्या अतिवापारामुळे विद्यार्थी आणि लहान मुलांना देखील चष्मा वापरावा लागतोय. वाढतं प्रदूषण आणि स्क्रिन टाईममुळे डोळ्यांच्या आजारात आणि दृष्टीदोषात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वांगसुंदर अशा अवयवाची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. ज्या व्यक्तींना चष्मा लागला त्या व्यक्तींना गाजर, बीट मुळा खाण्याच्या सल्ला नेत्रतज्ज्ञ द्यायचे मात्र आता डोळ्यांची काळजी  ही प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला दृष्टीदोष दूर करून डोळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा लागेल.

जाणून घेऊयात कोणते पदार्थ खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारू शकतं.

गाजर

Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
advertisement
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर वरदान मानलं जातं. गाजरात बीटा-कॅरोटीन असतं, ज्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं. डोळ्यांचा रेटिना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए मदत करतं. गाजराचं नियमित सेवन केल्याने रात्री कमी दिसण्याचा त्रास असल तर तो सुद्धा कमी होतो. गाजर कच्चं किंवा सलाड म्हणूनही खाता येतं. तुम्ही गाजराचा ज्यूसही पिऊ शकता.

अक्रोड आणि अळशीच्या बिया

advertisement
Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
अक्रोड आणि अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड अधिक प्रमाणात असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्यांचं आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांचा ओलावा कायम राहिल्यामुळे डोळ्यांच्या पडद्याचं आर्युमान वाढतं. दररोज 4 ते 5 अक्रोड आणि एक चमचा अळशीच्या बिया खाल्ल्यास तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारेलच मात्र तुमचं वजनही कमी व्हायला मदत होईल.
advertisement

हिरव्या पालेभाज्या

Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे पालक सूप, पालक पराठा किंवा पालकाची भाजी खाल्ल्याने तुमची दृष्टीदोष दूर व्हायला मदत होते.
advertisement

'व्हिटॅमिन सी' युक्त फळं

Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
संत्री, लिंबू आणि अनेक लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं, जे डोळ्यांच्या पेशींना होणारं संभाव्य नुकसान टाळतं. रोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने दृष्टी सुधारायला मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शरीराचं एकूणच आरोग्य सुधारल्याने डोळ्यांच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.
advertisement

अंड्याचा पिवळा बलक

Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
अंड्यातील पिवळ्या बलकात ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ई असते, जे डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात. उकडलेलं अंड खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. याशिवाय अंड्यात असलेले प्रोटिन्स शरीर तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Foods for Eyes: डोळ्यांची काळजी घ्यायची आहे? मग खा ‘हे’ पदार्थ, लावावा लागणार नाही चष्मा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement