Intermittent Fasting : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही करताय इंटरमिटेंट फास्टिंग? डॉक्टरांनी थेट सांगितला हार्ट अटॅकचा किती वाढतो धोका!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या ट्रेंडमध्ये इंटरमिटेंट फास्टिंग खूप लोकप्रिय झाले आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात.
Intermittent Fasting And Heart Attack Risk : आजच्या फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या ट्रेंडमध्ये इंटरमिटेंट फास्टिंग खूप लोकप्रिय झाले आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात. पण, नुकत्याच एका मोठ्या संशोधनाने या लोकप्रिय डाएटवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार, इंटरमिटेंट फास्टिंगमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. एक्स्पर्ट सुधीर आस्था यांनी एका पॉडकास्टमध्ये इंटरमिटेंट फास्टिंग किती धोकादायक आहे हे सांगितले आहे.
काय आहेत दुष्परिणाम
एका पॉडकास्टमध्ये बोलताना, सुधीर आस्था यांनी इंटरमिटेंट फास्टिंग कसं धोकादायक ठरत आहे याबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकन हार्ट असोसिएशनने आधी इंटरमिटेंट फास्टिंग आधी वजन कमी करायचा खूप चांगला मार्ग असल्याचे सांगितले. जेव्हा तुम्ही काही खात नाही तेव्हा शरीर जमा चरबी (Fat) खाण्यास सुरुवात करते ज्यामुळे फॅट लॉस होतो किंवा वजन कमी होत. ज्याला ऑटोफॅजी म्हटलं जात, जे आरोग्यसाठी स्वास्थकार मानलं जात होत. पण 18 मार्च 2024 ला अमेरिकन हार्ट असोसिएशनने एका अभ्यासात खुलासा केला की, त्यांनी 20,000 तरुणांवर रिसर्च केला आणि खुलासा की जेव्हा आपण फास्टिंग करतो तेव्हा आपल्या हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅकमुळे होणार धोका 91 टक्के वाढतो.
advertisement
इंटरमिटेंट फास्टिंगचे शरीरावर होणारे परिणाम
मृत्यूचा धोका वाढतो
संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक दिवसातून फक्त 8 तासांच्या 'फीडिंग विंडो'मध्ये खातात, त्यांच्यामध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 91% जास्त असतो.
शरीरावर ताण येतो
लहान 'ईटिंग विंडो'मध्ये जास्त खाणे आणि बराच वेळ उपाशी राहणे शरीरावर ताण आणते. यामुळे कोर्टिसोल सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढू शकते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
advertisement
अयोग्य खाण्याच्या सवयी
अनेक लोक फास्टिंगनंतर मिळेल ते खातात. अशा वेळी ते जास्त कॅलरी असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातात, ज्यामुळे वजन घटण्याऐवजी वाढू शकते.
पोषक तत्वांची कमतरता
जेव्हा खाण्याची वेळ मर्यादित असते, तेव्हा शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळणे कठीण होते. व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता झाल्यास हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.
advertisement
सर्वांसाठी योग्य नाही
हृदयविकार, मधुमेह किंवा इतर जुनाट आजार असलेल्या लोकांसाठी इंटरमिटेंट फास्टिंग घातक ठरू शकते.
संतुलित आहार हाच खरा उपाय
डॉक्टरांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या डाएटचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यासारखे पारंपारिक आणि सिद्ध झालेले उपाय हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी जास्त सुरक्षित आहेत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Intermittent Fasting : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही करताय इंटरमिटेंट फास्टिंग? डॉक्टरांनी थेट सांगितला हार्ट अटॅकचा किती वाढतो धोका!