Vaishno Devi Tour Package : फक्त 9 हजारांत करा वैष्णो देवी दर्शन; IRCTC कडून सर्वात स्वस्त टूर पॅकेज लॉन्च
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
IRCTC Tour Package : या पॅकेजमध्ये जम्मू रेल्वे स्थानकापासून कटरा येथील हॉटेलपर्यंत शेअरिंग वाहन सुविधा, कटरा येथे 2 रात्रींची शेअरिंग आधारावरील निवास व्यवस्था, पॅकेजनुसार फक्त नाश्ता किंवा नास्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट असेल.
मुंबई : तुम्ही या महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीने वैष्णो देवीसाठी एक खास टूर पॅकेज सुरू केले आहे. तुम्ही किंवा तुमचे आई वडील वैष्णो देवीला दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे परवडणारे टूर पॅकेज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रवासाची योजना आखणाऱ्या भाविकांसाठी हे पॅकेज उपलब्ध आहे. वैष्णो देवी मंदिर येथे दर्शनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.
किती दिवसांचे आहे टूर पॅकेज?
हे पॅकेज लखनऊ, शाहजहांपूर, सुलतानपूर, वाराणसी, जौनपूर जंक्शन आणि मुरादाबाद येथून सुरू होणार आहे. पॅकेजचा कालावधी 4 रात्री आणि 5 दिवसांचा असून याचा कोड NLR022 आहे. 26 फेब्रुवारीपासून या पॅकेजची सुरुवात होणार असून त्यानंतर दर गुरुवारी प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. या पॅकेजमध्ये रेल्वे तिकीट तसेच स्थानिक पर्यटनासाठी वाहनाची सोय समाविष्ट आहे. पॅकेजचे नाव MATA VAISHNO DEVI EX VARANASI असे असून अधिकृत संकेतस्थळावर हे नाव शोधून सविस्तर माहिती मिळवता येईल.
advertisement
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च किती?
तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास प्रतिव्यक्ती पॅकेज 16,460 रुपये खर्च येईल. दोन जणांनी एकत्र प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 9,905 रुपये इतकी पॅकेजची किंमत आहे. तसेच तीन जणांनी एकत्र प्रास केल्यास प्रति व्यक्ती 8,635 रुपये खर्च येईल. याशिवाय तुमच्यासोबत मुलं देखील प्रवास करणार असतील तरत मुलांसाठी पॅकेजचे शुल्क 6,840 रुपये ठेवण्यात आले आहे.दोन प्रकारच्या भोजन पर्यायांनुसार शुल्क बदलते. नाश्ता समाविष्ट असलेल्या पॅकेजसाठी 15,460 आणि नाश्ता व रात्रीचे जेवण समाविष्ट असल्यास 16,460 शुल्क आकारले जाईल.
advertisement
पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सुविधा
या पॅकेजमध्ये जम्मू रेल्वे स्थानकापासून कटरा येथील हॉटेलपर्यंत शेअरिंग वाहन सुविधा, कटरा येथे 2 रात्रींची शेअरिंग आधारावरील निवास व्यवस्था, पॅकेजनुसार फक्त नाश्ता किंवा नास्ता आणि रात्रीचे जेवण समाविष्ट असेल. तसेच ठरवलेल्या मेन्यूप्रमाणेच भोजन दिले जाईल, मेन्यूत बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
पॅकेजचे बुकिंग कसे करावे?
पॅकेजचे बुकिंग भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल. या पॅकेजसाठी नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. इच्छुक भाविक भारतीय रेल्वेच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवर जाऊन 'MATA VAISHNO DEVI EX VARANASI' किंवा 'NLR022' हा कोड सर्च करून संपूर्ण माहिती वाचू शकतात आणि आपले तिकीट बुक करू शकतात. पॅकेजमध्ये ठरवून दिलेल्या सुविधांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा लाभ घेतल्यास त्याचे पैसे स्वतः द्यावे लागतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 5:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vaishno Devi Tour Package : फक्त 9 हजारांत करा वैष्णो देवी दर्शन; IRCTC कडून सर्वात स्वस्त टूर पॅकेज लॉन्च







