Raksha Bandhan 2025: सोशल मीडियावर धमाका, आता रक्षाबंधनाला लबूबू राखीची क्रेझ, फक्त 200 रुपयाला करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
रक्षाबंधन अवघ्या दिवसांवर आले असून, बाजारपेठा पारंपरिक राख्यांच्या सजावटीने रंगून गेल्या आहेत. मात्र यंदाच्या राखी खरेदीत लाबुबु राखीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन अवघ्या दिवसांवर आले असून, बाजारपेठा पारंपरिक राख्यांच्या सजावटीने रंगून गेल्या आहेत. मात्र यंदाच्या राखी खरेदीत लबूबू राखीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ही राखी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होत असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील ग्राहक या राख्या खास आकर्षण म्हणून खरेदी करत आहेत. बाजारात 5 रुपयांपासून 500 आणि 1 हजार रुपयांपर्यंत देखील अशा विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आणल्या असल्याचे राखी विक्रेते गणेश तांदळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
लबूबू म्हणजे काय..?
लबूबू हे 'द मास्टर्स' या व्हिएतनामी डिजिटल आर्ट बँडमधील लबूबू एक लोकप्रिय कॅरेक्टर आहे. बुटके शरीर, मोठे डोळे आणि मजेशीर चेहरा असलेले हे गोंडस पात्र इंटरनेटवर खूपच गाजले. सुरुवातीला टॉयज आणि ॲनिमेटेड व्हिडिओमधून झळकलेले लबूबू आता सोशल मीडियावर स्टिकर्स, रिल्सच्या रूपात जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः टीन एजर्स आणि युवा वर्गात लबूबूची क्रेझ प्रचंड आहे.
advertisement
विक्रेते राख्या कोठून आणतात..!
view commentsबाजारपेठेत या राख्या मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध असून, लबूबू राखीची किंमत 200 ते 350 रुपयांदरम्यान आहे. त्याशिवाय पारंपरिक झरझरीत, कुंदन, मोरपंख, पर्ल डिझाईन राख्या, तसेच सुपरहिरो, युनिकॉर्न, मिनियन, टॉम अँड जेरी इत्यादी कार्टून थीम्स असलेल्या राख्या 50 ते 500 रुपयांपर्यंत मिळत आहेत. ग्राहकांची पसंती लहान मुलांसाठी कार्टून राख्यांकडे तर तरुणाई लाबुबु आणि ट्रेंडी राख्यांकडे झुकताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राख्यांचा माल सुरत, दिल्ली, कलकत्ता, मुंबई येथून मोठ्या प्रमाणात राख्यांचा माल येतो. 5 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध असल्याचे राखी विक्रेत्या चित्रा वाणी यांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 07, 2025 2:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raksha Bandhan 2025: सोशल मीडियावर धमाका, आता रक्षाबंधनाला लबूबू राखीची क्रेझ, फक्त 200 रुपयाला करा खरेदी

